IMPIMP

ST Workers Strike | ‘एसटीचे विलीनीकरण का होणार नाही ते सांगावे’; चंद्रकांत पाटलांचे अजित पवारांना आव्हान

by bali123
ST Workers Strike | ajit pawar explain why st will not be merged chandrakant patil question

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन राज्य परिवहन महामंडळाचे (MSRTC) राज्य सरकारमध्ये (Maharashtra Government) विलीनीकरण (Merger) करावे यासाठी कर्मचारी संपावर आहेत. अनेक दिवसापासून हा संप (ST Workers Strike) सुरु असून त्यावर तोडगा काही निघाला नाही. त्यातच विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एसटी कामगाराचं (ST Workers Strike) शासनात विलिनीतरण शक्य नाही, एसटीचं विलिनीकरण होईल असं डोक्यातून काढून टाका, अशा शब्दात त्यांनी ठणकावले होते. त्याला आणता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवारांचा परखडपणा सर्वत्र चालणार नाही. एसटीच विलीनीकरण का होणार नाही हे स्पष्ट कराव असे आव्हान त्यांनी अजित पवार यांना दिले आहे. (MSRTC Merger in Maharashtra Government)

परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी कर्मचारी संपावर (ST Workers Strike) आहेत. विलीनीकरणा वर कर्मचारी ठाम असल्याने कोणताही मार्ग निघेना. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाच मुद्दा धरून विधानसभेत एसटी कामगारांचे शासनात विलिनीकरण शक्य नाही अशी स्पष्ट ग्वाही दिली. ते म्हणाले शासनाने आपली भूमिका मांडली आहे. विलिनीकरणाच्या मागणीचा चेंडू उच्च न्यायालयात आहे, न्यायालयाच्या निर्देशावरुन विलिनीकरणाची शक्यता तपासण्यासाठी एक समिती स्थापन झालेली आहे. समितीने अभ्यास सुरु केला असून अभ्यासासाठी समितीने मुदत वाढ मागितल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली. समितीचा अहवाल येईल तेव्हा येईल पण कर्मचाऱ्यानी विलीनीकरण होईल हे डोक्यातून काढून टाकावे, असे पवार यांनी म्हंटले होते.

अजित पवार यांच्या वक्तव्याला भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, गेंड्याच्या कातडीपेक्षाही हे सरकार भयानक बनले आहे.
म्हाडा (Mhada Exam), आरोग्य, टीईटी परीक्षेत (MahaTET Exam Scam) मोठा भष्ट्राचार झाला आहे. यामध्ये सगळ्यांचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत गेले आहेत.

यामध्ये अनेक मंत्री अडकण्याची शक्यता असल्याचा आरोप करत सीबीआय चौकशीनंतर सत्य समोर येईल, असेही ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस (Devendra Fadnavis) हे योग्य वेळी फोन टॅपिंग प्रकरणी न्यायालयासमोर जातील असे त्यांनी सांगितले.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आयोजित केलेल्या
अटलशक्ती महासपर्क अभियानात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सहभागी झाले आहेत.
कोथरुड (kothrud) येथील गांधीभवन येथे सोसायटीतील मतदार आणि बूथ प्रमुख यांना भेटून केंद्राच्या योजनांची माहिती दिली जात आहे.
आज भाजपचे ३० हजार कार्यकर्ते दीड लाख कुटूंबापर्यंत पोहोचणार आहेत.
हे कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Web Title :- ST Workers Strike | ajit pawar explain why st will not be merged chandrakant patil question

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

हे देखील वाचा :

Related Posts