IMPIMP

ST workers strike | खाजगी बसेस पुन्हा धावणार; राज्य सरकारने घेतली सुरक्षेची हमी

by nagesh
ST Workers Strike | st workers strike decision impose mesma liaison workers after 20th information transport minister anil parab msrtc

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन ST workers strike | गेल्या काही दिवसांपासून आपल्या प्रलंबित मागण्यासाठी एसटी कामगारांनी राज्यव्यापी संप (ST workers strike) पुकारला. या संपामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचा विचार करता राज्य सरकारने (Maharashtra Government) खासगी बसेस (Private buses) यांना प्रवासास परवानगी दिली होती. मात्र, एसटी प्रशासन अधिकारी, स्थानिक पोलिस अधिकारी यांच्याकडून सहकार्य न मिळाल्यामुळे खासगी बसेसना विना प्रवासी परत यावे लागले. यामुळे नुकसान झाल्याने आज (गुरूवार) सकाळपासून खाजगी बस बंद केली होती. परंतु खासगी बस पुन्हा धावणार असल्याची माहिती समोर आलीय.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आता खाजगी बस पुन्हा एसटी स्टँडच्या आवारातून धावणार आहे. अशी माहिती खाजगी बस संघटनेचे कार्याध्यक्ष बाबा शिंदे (Baba Shinde) यांनी दिली आहे. बुधवारी 8 ते 10 ठिकाणी खासगी बसेसवर दगडफेक करण्यात आली. त्याचबरोबर अनेक ठिकाणी चालकांना मारहाण करण्यात आली. यामुळे आज (गुरूवारी) सकाळी 10 वाजल्यापासून पुणे व राज्यातील इतर ठिकाणी खाजगी बस एसटीच्या आवारातून न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. असं बाबा शिंदे (Baba Shinde) म्हणाले.

दरम्यान, मंत्री अनिल परब यांच्यासोबत सर्व संघटनांचे प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये पोलीस महासंचालक, माननीय परिवहन आयुक्त, एसटीचे संचालक होते. खाजगी बसेसला सुरक्षा आणि चालकांना सुरक्षा देण्याची हमी मिळाल्यानंतर खाजगी बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे शिंदे यांनी सांगितले आहे. (ST workers strike)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : ST workers strike | private buses will run through st premises again anil parab

हे देखील वाचा :

Pune Crime | फसवणूक प्रकरण ! एम. जी. एन्टप्रायजेसच्या अलनेश सोमजीच्या पोलीस कोठडीत वाढ तर पत्नी डिंपल सोमजीचा जामीनासाठी अर्ज

PF Balance | इंटरनेट आणि मोबाइल डेटा न वापरता चुटकीत जाणुन घ्या आपला PF बॅलन्स, अतिशय सोपी आहे ‘ही’ पद्धत

Disha Parmar-Rahul Vaidya | अनोख्या अंदाजात दिशाचा वाढदिवस होतोय साजरा; पती राहुल वैद्यने शेअर केले दोघांचे रोमँटिक फोटो !

Related Posts