IMPIMP

‘धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध’ : धनंजय मुंडे

by sikandershaikh
dhananjay-munde

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या न्यायालयीन प्रक्रियेसह महाविकास आघाडीचे सरकार (state government ) समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून, त्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर आखलेल्या 13 विकास योजनांना भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असं आश्वासन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिलं आहे. विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना त्यांनी याबाबत भाष्य केलं.

‘1 हजार कोटी देण्याचे घोषित केलं, त्यातील एक रुपयाही प्रत्यक्षात दिला नाही’

धनंजय मुंडे म्हणाले, मागील सरकारच्या (state government ) काळात धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी टाटा इन्सि्टट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेनं दिलेला अहवाल न्यायालयात सादर करण्यास तत्कालीन सरकारनं उशीर केला. तसंच 2019 मध्ये निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून समाजाला विविध विकासाच्या 13 योजनांची घोषणा करून 1 हजार कोटी रुपये देण्याचं घोषित केलं. मात्र, त्यातील एक रुपयाही प्रत्यक्षात दिला नाही. हे त्यावेळी सत्तेत असणाऱ्या आमदारांनीसुद्धा सभागृहात मान्य केलं आहे.

2020-21 या कालावधीत धनगर समाजाच्या विकासासाठी घोषित करण्यात आलेला 51 कोटींचा निधी कोविड निर्बंध असतानाही काही प्रमाणात वितरीत करण्यात आलेला असून, येत्या काळात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारच्या वतीनं मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असंही मुंडे यांनी सांगितलं.

Related Posts