IMPIMP

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत कराव्या लागणार

by nagesh
Thackeray Government | now all shop signs have be done marathi big decision maharashtra Thackeray government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Thackeray Government | राज्यातील ठाकरे सरकारने (Thackeray Government) एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व दुकानांच्या (Shops) पाट्या मराठीत (Marathi) मोठ्या अक्षरात असाव्यात या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या (Maharashtra Cabinet) बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व दुकानाच्या पाट्या (All Shop Signs) आता मराठीमध्येच (Marathi Signs) दिसणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (बुधवारी) मराठी भाषेविषयी निर्णय घेण्यात आला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम 2017 हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना आणि दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आलं होतं. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. त्याचबरोबर उपाययोजना करण्याचीही मागणी केली जात होती. अखेर याबाबत निर्णय आज घेतला गेला आहे.(Thackeray Government)

दरम्यान, मंत्रीमंडळाने आज महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयमन) अधिनियम, 2017 यात सुधारणा करण्याचा आणि पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. बहुसंख्य दुकाने आणि व्यापारी पेढ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्यालगतच्या सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत लागलेल्या दिसतील. मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीही दुरुस्ती मंजूर करण्यात आली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  Thackeray Government | now all shop signs have be done marathi big decision maharashtra Thackeray government

हे देखील वाचा :

Ayurvedic Treatment For PCOD Problems | ‘या’ आयुर्वेदीक उपायाने होईल PCOD च्या समस्येवर मात; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Shri Ram Mandir | मकर संक्रांतीला लोणी काळभोर येथील श्री राम मंदीर बंद राहणार

Rakesh Jhunjhunwala | ‘बक्कळ’ कमाईनंतर राकेश झुनझुनवाला यांनी ‘या’ स्टॉकमधून गुंतवणूक काढली

Related Posts