IMPIMP

Uday Samant | ‘ट्यूशन फी’ वगळता इतर शुल्क कमी होणार, सोमवारी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक

by bali123
Uday Samant | cabinet minister uday samant tweet appeals some leaders to speak properly

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Uday Samant | अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (College of Engineering) शुल्कामध्ये 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर राज्यातील सर्व विद्यापीठांना (University) ‘ट्यूशन फी’ (Tuition fee) वगळून इतर शुल्क कमी करता येऊ शकते का ? याबाबत येत्या सोमवारी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेणार आहे (Meeting of the Vice-Chancellors of all the Universities in the State), अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Higher and Technical Education Minister Uday Samant) यांनी आज (रविवार) पत्रकार परिषदेत दिली. Uday Samant | except tuition fees all universities state other fees will be reduced uday samant minister state

कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर सध्या केवळ ऑनलाइन पद्धतीने शिक्षण (Online learning) दिले जात आहे. त्यामुळे प्रयोगशाळा (Laboratory), कॉम्प्युटर लॅब (Computer lab), जिमखाना (Gymkhana), ग्रंथालय (Library) इत्यादी गोष्टींचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येत नाही. त्यामुळे हे शुल्क (Charges) कमी करावे, अशी मागणी होत आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शुल्कात कपात

राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या (Government Engineering College) शुल्कात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहेत. या निर्णयामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयातील (College of Engineering) सुमारे 26 हजार रुपये शुल्क कमी करण्यात आले. राज्यातील सर्व विद्यापीठांना याबाबत आवाहन करण्यात येणार असल्याचे उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले.

शुल्क निश्चित करण्याचा अधिकार FRA ला

उदय सामंत यांनी पुढे सांगितले की, राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या (Vocational courses) विनाअनुदानित महाविद्यालयांचे शुल्क निश्चित करण्याचे अधिकार रेगुलेटिंग अ‍ॅथोरिटीला (FRA) आहेत. तांत्रिक कारणामुळे एफआरए (FRA) समिती स्थापन होऊ शकली नाही. एफआरए स्वायत्त असून व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क कमी करण्याबाबत या समितीकडून शासनाला प्रस्ताव (Proposal) प्राप्त झाल्यानंतर निर्णय घेतला जाईल. याशिवाय एफआरए स्वत: विद्यार्थी व पालकांना दिलासा देण्यासाठी निर्णय घेऊ शकते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

नवीन शैक्षणिक वर्ष सुरु करण्याच्या सूचना

एआयसीटीईने (AICTE) 1 ते 15 सप्टेंबर दरम्यान नवीन शैक्षणिक वर्ष (New academic year) सुरु करण्याच्या सूचना केल्या आहेत.
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जुलै (July) महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या (August) पहिल्या आठवड्यात सीईटी (CET) घेतली जाणार आहे.
तसेच अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी (non-professional courses) सीईटी घ्यावी किंवा नाही,
यासंदर्भातला निर्णय 12 वीच्या गुणपत्रिका हातात पडल्यावर गुणपत्रिकेचा अभ्यास करुन घेतला जाणार आहे.
तंत्रशिक्षण (Technical education) पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश 12 वीच्या गुणपत्रिकेच्या आधारित केले जाणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

Web Titel :- Uday Samant | except tuition fees all universities state other fees will be reduced uday samant minister state

Related Posts