IMPIMP

Udayanraje Bhosale | शिवेंद्रराजेंचा विरोध असतानाही उदयनराजेंची बिनविरोध निवड !

by nagesh
UdayanRaje Bhosale | no one received a call for the program at pratapgarh udayanraje bhosale clearly stated

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन –  सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मोठी घडामोड झालीय. जिल्हा बँकेचे चेअरमन शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosle) यांचा उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या जागेला विरोध असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी सर्व उमेदवारांनी माघार घेतल्यानं उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची बिनविरोध निवड झाली आहे. उदयनराजे भोसले यांची गृहनिर्माण व दुग्ध विकास संस्था गटातून बिनविरोध निवड (elected unopposed) झाली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीमध्ये (satara jilha madhyavarti bank election) भाजपचे (BJP) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)
यांनी गृहनिर्माणमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
त्यानंतर त्यांचेच बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांना विरोध दर्शवला होता.
दोघांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. या दरम्यान खासदार उदयनराजे यांनी जिल्हा बँक आणि यातील पदाधिकाऱ्यावर तसेच राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांवर गंभीर आरोप केले होते.

उदयनराजे यांच्या आरोपांमुळे राष्ट्रवादीमध्ये नाराजी दिसत होती.
मात्र, दिवाळीनंतर उदयनराजे यांनी राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेसच्या (Congress) महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांची मनरधरणी केली.
त्यामुळे उदयनराजे भोसले यांचा जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा मार्ग मोकळा झाला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

उदयनराजे भोसले यांच्या विरोधात नामदेव सावंत, दादासाहेब बडदरे, ज्ञानेश्वर पवार, जयवंत पाटील, दिलीपसिंह भोसले यांनी अर्ज माघारी घेतला.
त्यामुळे उदयनराजे बिनविरोध निवडून आले. यानंतर कार्यकर्त्यांनी फटके फोडून घोषणाबाजी करत मोठा जल्लोष केला.

Web Title :  Udayanraje Bhosale | udayan raje bhosale was elected unopposed in the election of satara district central bank

हे देखील वाचा :

Bribe Case | 5 हजाराची लाच घेताना महिला उप अभियंता जाळ्यात

Pune ST Workers Strike | सरकारने एसटी स्थानकात ‘सवत’ आणल्यानं ST कामगारांचा ‘जागरण गोंधळ

Pune Crime | पुण्याच्या हडपसरमधील धक्कादायक घटना ! प्रेमसंबंधाबाबत पतीला सांगून बदनामी करण्याची धमकी; 30 वर्षीय विवाहितेकडे शरीरसुखाची मागणी

Related Posts