IMPIMP

Lockdown च्या विरोधात उदयनराजेंचे साताऱ्यात ‘भीक मांगो’ आंदोलन

by pranjalishirish
udayanraje bhosle bhikh mango andolan opposed lockdown with agitation at povai naka of satara

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात ब्रेक दि चेनच्या अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र राज्यात अनेक ठिकाणी याला विरोध होत आहे. दरम्यान साता-यात भाजप खासदार उदयनराजे भोसले UdayanRaje Bhosle यांनीही शनिवारी (दि. 10) लॉकडाऊनला विरोध केला. अशा प्रकारचे निर्बंध लावले तर व्यापाऱ्यांवर भीक मागायची वेळ येईल, असे म्हणत चक्क हातात थाळी घेऊन भीक मागो आंदोलन केले. राज्य सरकारच्या या निर्णयाचा त्यांनी निषेध केला. उदयनराजे यांनी यावेळी सचिन वाझे प्रकरणासह इतर सर्वच विषयांवरून राज्य सरकारवर टीका केली.

शिवसेनेचा मोदी सरकावर हल्लाबोल, म्हणाले – ‘लसीचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून महाराष्ट्राला छळण्याचा केंद्राचा डाव’

साताऱ्याच्या पोवईनाका परिसरात उदयनराजे UdayanRaje Bhosle यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करत त्यासमोरील आंब्याच्या झाडाखाली पोतं टाकून बसत थाळी ठेवून उदयनराजेंनी चक्क भीक मागो आंदोलन केले. त्यानंतर उदयनराजेंनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत फेरफटका मारत शासनाच्या तुघलकी कारभाराचाही निषेध व्यक्त केला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुकारलेल्या दोन दिवसीय पूर्ण लॉकडाउनला सातारा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्‍यक सेवा सोडून इतर सर्व व्यवहार, वाहतूक व्यवस्था बंद राहिल्याने सर्वत्र सामसूम होते. उदयनराजेंनी शुक्रवारीच व्यापाऱ्यांच्या पाठिशी असल्याचे सांगत अगदी थेटपणे त्यांची भूमिका मांडली होती. त्यानंतर शनिवारी त्यांनी व्यापाऱ्यांसह थेट आंदोलनातच सहभाग घेत लॉकडाऊनला विरोध केला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पोवईनाका परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

Read More : 

संजय राऊतांनी फडणवीसांना दिला सल्ला, म्हणाले – ‘प्रसंग बाका, सरकार कोणाचं हे पाहू नका, दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्या’

15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात

Balasaheb Thorat : ‘राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्व देत नाही’

राज्यात 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण Lockdown ? मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर होऊ शकतो निर्णय

खा. विनायक राऊतांचा राणेंवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘कोकण सम्राटां’ नी चिपी विमानतळाचं कंत्राट दळभद्री कंपनीला देऊन वाट लावली

शिवसेनेकडून डॉ. हर्षवर्धन, जावडेकर अन् महाराष्ट्र भाजपचा समाचार, म्हणाले – ‘जे असे राजकारणाची वळवळ करीत आहेत त्यांना भिडेंच्या भाषेत…’

सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी रूग्णालयात दाखल

मोहन भागवतांना कोरोना झाल्यानंतर अमोल मिटकरी म्हणाले – ‘आता भिडे गुरुजींना विचारा’

रेमेडिसिवीर इंजेक्शनची वितरण व्यवस्था अन्न व औषध प्रशासनाकडे सोपवावी, खा.डॉ.अमोल कोल्हे यांची राज्य सरकारकडे मागणी

Related Posts