IMPIMP

Ex PM डॉ. मनमोहन सिंग यांनी सांगितलं देशातील वाढत्या बेरोजगारीचं कारण, म्हणाले- मोदी सरकारचा ‘तो’ निर्णयच जबाबदार

by sikandershaikh
manmohan-singh-modi

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी वाढती बेरोजगारी आणि इतर मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. नोटबंदीचा निर्णय चुकीचाच होता असा पुनुरुच्चार करत ते म्हणाले, भाजप सरकारनं कोणताही विचार न करता घेतलेल्या निर्णयामुळंच देशात बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे. तसंच असंघटीत क्षेत्रही मोडकळीस आले आहेत असंही सिंग म्हणाले. मोदी सरकार राज्यांसोबत नियमितपणे विचार विनिमय करत नाहीत असा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला. मंगळवारी (दि 2 मार्च) केरळमध्ये राजीव गांधी डेव्हलपमेंट स्टडीजच्या व्हर्चुअल संमेलनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते.

मनमोहन सिंग म्हणाले, सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या तात्पुरत्या उपाययोजनांनी पतपुरवठा समस्या लपवता येणार नाही. या संकटाचा परिणाम लुघ आणि मध्यम क्षेत्रावर होऊ शकतो. देशात बेरोजगारी अधिक आहे आणि असंघटीत क्षेत्र ढासळलं आहे. हे संकट 2016 मध्ये कोणत्याही विचारांशिवाय घेण्यात आलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळं उद्भवलं आहे असंही ते म्हणाले.

पुढं बोलताना सिंग म्हणाले, संघटना आणि राज्यांशी नियमितपणे सल्लामसलत करणं,
ही भारताची आर्थिक आणि राजकीय आधारभूत संस्था आहे आणि घटनेत याबद्दल लिहिण्यात आलं आहे.
परंतु विद्यमान केंद्र सरकार त्याला महत्त्व देत नाही असंही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.

‘बाधा पार करून पुढं जायचंय’

सिंग म्हणाले, या ठिकाणी अनेक बाधा आहेत. यातून राज्याला पुढं न्यायचं आहे.
डिजिटल प्रणालीमुळं माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र काम करू शकत नाही.
परंतु पर्यटन क्षेत्राला कोरोनाच्या महासंकटाचा मोठा फटका बसला आहे.
शिक्षण आणि आरोग्यावर लक्ष दिल्यामुळं केरळचे लोक देशात आणि जगातील इतर भागात नोकरी मिळवण्यास सक्षम झाले आहेत असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

Photos : ‘बिकिनी’प्रमाणे साडीतही तितकीच ‘बोल्ड’ दिसते मल्लिका शेरावत ! व्हायरल झाले फोटो

Related Posts