IMPIMP

केंद्रीय मंत्र्याची ममता बॅनर्जींवर टीका; म्हणाले – या फक्त ‘निवडणुकीपुरत्या हिंदू’ (व्हिडिओ)

by bali123
union minister giriraj singh calls mamata banerjee chunavi hindu

नंदीग्राम : वृत्तसंस्था पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नंदीग्राम येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मंगळवारी (दि.9) ममता बॅनर्जी mamata banerjee यांनी चंडीपाठ या धार्मिक लेखातील मंत्राचे पठण केले. यावेळी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, मी दररोज घरातून बाहेर पडण्यापूर्वी चंडीपाठाचे उच्चारण करत असते. यावर भाजप नेत्याने ममता बॅनर्जी mamata banerjee यांना ठणकावले. हिंदुत्ववादाचा खेळ माझ्याबरोबर खेळू नये, असे भाजप नेत्याने म्हटले होते.

यावर बोलताना केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी म्हटले आहे की, ममता बॅनर्जी या फक्त निवडणुकीपुरत्या हिंदू आहेत. गिरीराज सिंग यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत ममता बॅनर्जी mamata banerjee यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ममता बॅनर्जी यांनी निवडणुकांच्या दडपणाखाली या स्तोत्राचा जप केला आहे. वाह रे मोदी, आज दीदी चंडीपाठ कर रही है, वाह रे मोदी, आज दीदी चुनाव जो ना कराए आपको (आज दीदी चंडीपाठाचे पठण करीत आहेत. ही निवडणूक तुम्हाला काय काय करायला लावत आहे) असे गिरीराज सिंग यांनी म्हटले आहे. तसेच ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांपूर्वी जरा घाबरल्या आहेत आणि त्यांना मशिदीत की मंदिरात जायचे हे माहीत नाही, असे गिरीराज सिंग म्हणाले.

ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सुवेदू अधिकारी म्हणाले, ममतांनी चुकीच्या मंत्राचा जप केला आहे. एका ट्विटमध्ये अधिकारी यांनी असा दावा केला आहे की, ममता बॅनर्जी यांनी मंत्राचे पठण चुकीचे केले असून, त्यांनी बंगालच्या संस्कृतीचा अपमान केला आहे.

ममता बॅनर्जींना मोठा झटका ! 5 आमदारांनी केला ‘तृणमूल’ला रामराम

Related Posts