IMPIMP

…म्हणून देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट

by Team Deccan Express
vaccination drive devendra fadnavis will meet uddhav thackeray

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइनराज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, आरोग्ययंत्रणांवर याचा मोठा ताण येत आहे. बहुतांश रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सेवाही देता येत नाही. या सर्व घडामोडीनंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस devendra fadnavis हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्ह्यांना लसींचा साठा पुरविण्यात यावा, अशी मागणी करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadanvis : …म्हणून महाराष्ट्रात सर्वात जास्त लसीकरण

देवेंद्र फडणवीस devendra fadnavis हे सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी माध्यमांशी बोलताना यावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि लशींची उपलब्धता कमी प्रमाणात होत आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्ह्यांना लसींचा साठा मिळायला हवा. तसे झाल्यास तुटवडा भासणार नाही. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी करणार आहे. तसेच राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनीच सांगितल्यानुसार, महाराष्ट्राने सर्वात जास्त लसीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे केंद्राकडून लस पुरवठ्याबाबत प्रश्न निर्माण करण्यात काही तथ्य नाही’, असेही त्यांनी सांगितले.

पडळकर-खोत म्हणतात – ‘सांगलीचे पालकमंत्री निष्क्रीय तर शासन…’

दरम्यान, देवेंद्र फडणवीस devendra fadnavis यांनी अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील कोविड केअर युनिटला भेट दिली. त्यावेळी त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोनाबाधितांची संख्या, औषधांचा साठा, बेड्स, ऑक्सिजन पुरवठा आणि लसीकरण मोहीम याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून तपशीलवार माहिती घेतली. यादरम्यान देवेंद्र फडणवीस devendra fadnavis यांनी डॉक्टरांशीही संवाद साधत त्यांच्याकडून घडत असलेल्या रुग्णसेवेचे कौतुक केले.

Also Read :

इस्रायलमध्ये बोनफायर फेस्टिव्हलमध्ये चेंगराचेंगरी; ४४ जणांच्या मृत्यूची शक्यता

‘खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय’, ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरुन गिरीश महाजनांचा शेलक्या शब्दांत खडसेंना टोला

ठाकरे सरकारची वचनपूर्ती, 9 लाख नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात 137.61 कोटी रुपये जमा

पंकजा मुंडे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, ट्विट करुन दिली माहिती

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

Related Posts