IMPIMP

Vijay Wadettiwar | ‘तिसरी लाट येण्याची शक्यता वाढली !

by nagesh
Vijay Wadettiwar | coronavirus third wave possibility increase in maharashtra said vijay Wadettiwar

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन –  Vijay Wadettiwar | नुकतंच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Corona virus) धोका कमी झाला आहे. राज्यात कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याची चर्चा मागील एक महिन्यापासुन सुरु आहे. दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अनेक तज्ञांकडुन वर्तवण्यात आला होता. मात्र राज्यात कोरोना तिसऱ्या लाटेचा (Coronavirus third wave) धोका वाढला आहे, असं भाष्य महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलं आहे. यावरुन आता कोरोनाची संभाव्य तिसरी लाट राज्यात येऊन कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यताही वाढली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्याबाबत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

यावेळी बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले की, ऑगस्ट-सप्टेंबर (August-September) महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
त्याबरोबरच आता केरळात कोविड बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे.
महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांत रुग्णसंख्या कायम आहे.
यावर गर्दी टाळणे आणि लसीकरण हा उपाय असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
पुढे ते म्हणाले, ज्यावेळी मुख्यमंत्री, तज्ज्ञ, आरोग्य यंत्रणेने तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला होता त्यावेळी भाजप त्याची गंमत करत होते. भाजप (BJP) मागणी करत आहे मंदिरे उघडा.
तुम्हाला मागणीच करायची असेल तर शाळा उघडण्याची करा ना, मुलांच्या शैक्षणिक विचार करा.
गर्दीमुळेच सर्वकाही होत आहे. मुख्यमंत्री अगदी सावधपणे पाऊल टाकून निर्णय घेताहेत. असं ते म्हणाले.

दरम्यान, तिसरी लाट येण्याची शक्यता आता वाढली आहे. केरळमध्ये आणि महाराष्ट्रातही वाढली आहे.
अशा परिस्थितीत गर्दी टाळणं हाच त्यावरचा उपाय आहे. नाहीतर पुन्हा निर्बंधांना जावं लागेल.
पूर्वीपासून तज्ज्ञांचं मत आहे की, तिसरी लाट येणार. दुसऱ्या लाटेचा आपला अंदाज चुकला, तिसऱ्या लाटेच्या संदर्भातील कुणाला काय अंदाज घेता येईल. लसीकरणावर भर देणं हा त्यामागचा उद्देश आहे.
तिसरी लाट जर आलीच तर शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर जाणार.
त्याला इलाज नाहीये. तो काय तुमच्या आणि आमच्या हातात नाहीये, सर्व काही परिस्थितीवर अवलंबून असल्याचं वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सांगितलं आहे.

Web Title : Vijay Wadettiwar | coronavirus third wave possibility increase in maharashtra said vijay Wadettiwar

हे देखील वाचा :

MLA Chetan Tupe | ‘शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी उपक्रम व्हावेत’ – आमदार चेतन तुपे

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी महत्वाची बातमी, ‘या’ महिन्यात मिळेल आणखी एक खुशखबर!

Mukesh Ambani | सप्टेंबरमध्ये 37 हजार कोटीचे मालक बनले मुकेश अंबानी, जाणून घ्या याचे कारण

Related Posts