IMPIMP

विरार रुग्णालयातील दुर्घटना ही काही राष्ट्रीय बातमी नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे वक्तव्य (व्हिडीओ)

by Team Deccan Express
virar fire incident not national news says maharashtra health minister rajesh tope

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – विरारमध्ये रुग्णालयाला लागलेल्या आगीत 13 कोरोना बाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेबद्दल सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे rajesh tope यांनी विरारमधील दुर्घटना राज्य सरकारची अंतर्गत बाब असून राष्ट्रीय स्तरावरील बातमी नसल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदींसोबत होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना टोपे rajesh tope यांनी हे वक्तव्य केले.

राज्यात कडक निर्बंध असतानाही गोकूळ निवडणूक प्रचारासाठी गर्दी; राजू शेट्टी म्हणतात…

नेमकं काय म्हणाले राजेश टोपे ?
पत्रकारांनी राजेश टोपे rajesh tope यांना पंतप्रधान मोदींसोबत होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता टोपे यांनी अनेक विषयांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करणार असलो तरी विरार दुर्घटना ही राष्ट्रीय बातमी नसल्याने आम्ही महापालिका स्तरावर आणि राज्य स्तरावर त्यासंदर्भात निर्णय घेऊन मदत करु, असे टोपे यांनी म्हटले. पंतप्रधान मोदींशी ऑक्सिजनसंदर्भात बोलणार आहोत, रेमडेसिविर संदर्भात देखील बोलणार आहोत. विरार रुग्णालयात घडलेली ही घटना राष्ट्रीय बातमी नाही. आम्ही राज्य सरकारच्या वतीने पूर्णपणे मदत करणार असल्याचे राजेश टोपे rajesh tope यांनी म्हटले आहे.

Virar Hospital Fire : ‘महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरु, राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे’

13 जणांचा मृत्यू झाला ही राष्ट्रीय बातमी नाही का असे पत्रकारने विचारले. त्यावर उत्तर देताना राजेश टोपे म्हणाले, अरे बाबा, राज्य सरकारच्या अंतर्गत आम्ही पूर्ण मदत करणार आहोत. यामध्ये महापालिकेकडून 5 लाखांची, राज्य सरकारकडून 5 लाखांची अशी 10 लाखांची मदत देणार आहोत. नाशिकमधील घटनेप्रमाणेच इथेही मदत दिली जाईल. कोणत्याही इमारतीचे फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट आणि इलेक्ट्रीकल ऑडिट करणं आवश्यक असतं. हे नियम न पाळणाऱ्या आणि त्यासंदर्भात दोषी असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणात सखोल चौकशी केली जाणार आहे. 10 दिवसात यासंदर्भात अहवाल सादर केला जाईल. घडलेली घटना दुर्दैवी आहे. आमच्या सद्भावना मृतांच्या नातेवाईकांसोबत आहेत, असे टोपे rajesh tope यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Also Read :

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

Related Posts