IMPIMP

WB Elections : ममतादीदींकडून आश्वासनांची बरसात

by pranjalishirish
WB Elections: lot of assurances from Mamata Banerjee

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे वातावरण तापत असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या सर्वोसर्वा ममता बॅनर्जी Mamata Banerjee यांनी आज पक्षाचा अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. तृणमूलच्या जाहीरनाम्यात ममतादीदींकडून आश्वासनांची बरसात करण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबाला किमान उत्पन्नाची हमी देण्यात आली आहे.

कन्याश्री, रुपश्री, स्वास्थ साथी योजना सुरू राहणार, गरिबांना वार्षिक सहा हजारांची मदत करणार, दिल्लीच्या धर्तीवर प्रत्येक घरी रेशन योजना, विधवा महिलांना एक हजारांची मदत देणार ,विद्यार्थ्यांसाठी वेगळे क्रेडिट कार्य सुरू करणार , बंगाल आवास अंतर्गत २५ हजार घरांची निर्मिती, अशी आश्वासने देण्यात आली आहेत.

राज्यातील प्रत्येक कुटुंबाला किमान उत्पन्नाची हमी राज्य सरकारने दिली असून यान्वये सर्वसाधारण श्रेणीतील १ कोटी ६ लाख लोकांना दरमहा पाचशे रुपये तर अनुसूचित जाती आणि जमाती गटातील जातींना एक हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. ही मदत संबंधित कुटुंबाची प्रमुख असणाऱ्या महिलेच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल, असे ममतांनी Mamata Banerjee सांगितले. राज्यातील ४७ लाख लोकांना नळातून पाणी पुरवठा करण्याबरोबरच दीड कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचे आश्वाूसन पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.

Also Read : 

अबब ! तब्बल 5 किलो सोन्याचे दागिने घालून उमेदवार पोहोचला अर्ज भरण्यासाठी

धक्कादायक ! कुस्तीच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्याने बबिता फोगटच्या बहिणीची आत्महत्या

सोलापूर काँग्रेसला नवी उभारी मिळणार ! गणेश माने देशमुख काँग्रेसमध्ये

भाजप नेत्याचा सवाल, म्हणाले – ‘मुख्यमंत्री ठाकरे वाझेंसाठी इतक्या बैठका का घेतायत?’

Sachin Vaze Case : ‘सचिन वाझेंना ‘ती’ मर्सिडीज घेण्यासाठी पटोले आणि सावंत यांचीच मदत’ ?

Related Posts