IMPIMP

‘शिवेंद्रराजेंना मोठा राजकीय, सामाजिक वारसा’, त्यांचा भविष्यकाळही उज्ज्वल, मी आयुष्यभर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन’ – रामराजे निंबाळकर

by pranjalishirish
we have been with shivendra raje all our lives says ramraje nimbalkar

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन : शिवेंद्रराजेंना shivendra raje मोठा राजकीय, सामाजिक वारसा आहे. आजपर्यंत त्यांनी त्याचे सोने करून दाखवले. त्यांचा भविष्यकाळही उज्ज्वल आहे. मी आयुष्यभर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे स्पष्टीकरण, म्हणाल्या – ‘PPF वरील व्याजदर जैसे थे, तो आदेश नजरचुकीने निघाला’

रामराजे निंबाळकर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत दुपारी आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन शिवेंद्रराजे shivendra raje  यांना बोलावून घेतले. तसेच शिवेंद्रराजे हे वाढदिवशी साताऱ्यात नव्हते. त्यामुळे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला नाही. मात्र, यावेळी वाढदिवसाचा केक कापत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी रामराजे निंबाळकर म्हणाले, ‘आमदार भोसले यांनी महाराष्ट्रभर अनेक माणसे जोडली आहेत. त्यांचा सौजन्यशाली स्वभाव हे त्यामागचे कारण आहे. सातारा जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. आपण त्यांच्या पाठीशी आयुष्यभर असणार आहोत’, असे गौरोद्गार त्यांनी काढले.

वडिल राजेंद्र पवारांना ‘कृषीरत्न’ जाहीर होताच पुत्र आमदार रोहित यांचे ‘हे’ ट्विट चर्चेत

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील राजकारणात खासदार उदयनराजे भोसले, रामराजे नाईक-निंबाळकर आणि शिवेंद्रराजे  shivendra raje भोसले या नेतेमंडळींची नावे प्रामुख्याने घेतली जातात. उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक-निंबाळकर या नेत्यांमधील वादाची चर्चा सर्वांनाच परिचयाची आहे. त्यानंतर आता शिवेंद्रराजे भोसले आणि रामराजे हे एकत्र दिसले आहेत.

Also Read:

गृहमंत्री देशमुखांवर 100 कोटीच्या हप्ता वसुलीचा आरोपानंतर आता चौकशी समितीवरून ‘कलगीतुरा’, सत्ताधारी-विरोधक ‘आमनेसामने’

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका ! ‘हा’ ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज IPL च्या बाहेर

Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयीन समितीची 18 राज्यातील 85 शेतकरी संघटनांसोबत चर्चा, अहवाल सुप्रीम कोर्टात सादर; लवकरच होणार सुनावणी

निवडणुकीच्या भीतीमुळे मोदी-शहा सरकारने निर्णय बदलला’, PPF वरील व्याजदर जैसे थे !

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे स्पष्टीकरण, म्हणाल्या – ‘PPF वरील व्याजदर जैसे थे, तो आदेश नजरचुकीने निघाला’

Related Posts