IMPIMP

Modi Cabinet Expansion | नारायण राणे, प्रीतम मुंडे, शिंदेंसह संभाव्य मंत्री पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दाखल

by bali123
Web Title : Modi Cabinet Expansion | Narayan Rane, Pritam Munde, Shinde and other potential ministers arrived at the residence of Prime Minister Modi

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार (Modi Cabinet Expansion) होत आहे. मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे (narayan rane), प्रीतम मुंडे (pritam munde) यांची वर्णी लागणार असल्याचं सांगितलं जातंय तर मध्य प्रदेशातून ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya scindia) यांचा समावेश होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, हे तिघेही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) निवासस्थानी दाखल झाल्याचं वृत्त आहे.

आज सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान केंदीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Modi Cabinet Expansion) होणार आहे.
त्यापुर्वी पीएम मोदी संभाव्य मंत्र्यांची भेट घेत आहेत.
सुमारे 17 ते 22 नवे मंत्री आज शपथ ग्रहण करतील अशी चर्चा आहे.
त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ देतील.
गेल्या काही दिवसांपासुन केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची (Modi Cabinet Expansion) जोरदार चर्चा सुरू होती.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

महाराष्ट्रातून नारायण राणे, हिना गावित यांची वर्णी लागणार अशी चर्चा होती.
मात्र, सध्यातरी नारायण राणे आणि दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची मुलगी खासदार प्रीतम मुंडे हे पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
भाजपकडून अगोदरच नेत्यांना फोनवरून मंत्रिपदाची सूचना देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली बाहेर असलेल्या नेत्यांना तात्काळ दिल्लीला बोलावून घेण्यात आलं आहे.
आज सायंकाळी 6 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
आता मात्र, महाराष्ट्रातून नारायण राणे आणि प्रीतम मुंडे यांची मंत्रिपदी वर्णी लागणार हे जवळपास निश्चितच झालं आहे अशी देखील चर्चा आहे.

Web Title : Modi Cabinet Expansion | Narayan Rane, Pritam Munde, Shinde and other potential ministers arrived at the residence of Prime Minister Modi

Related Posts