IMPIMP

West Bengal Election 2021 : ममता दीदींचा अमित शाहांना टोला, म्हणाल्या – ‘200 जागा विसरा, भाजपला मोठा रसगुल्ला मिळेल’

by pranjalishirish
west bengal assembly election 2021 mamata banerjee says bjp will get big rosogolla

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Legislative Assembly Election 2021) पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झालं आहे. 30 मतदारसंघात 79.79 टक्के मतदान झालं आहे. पहिल्याच टप्प्यात झालेल्या भरघोस मतदानानंतर आता पुन्हा एकदा प्रचाराला वेग आल्याचं दिसत आहे. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजपला 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी व्यक्त केला. यावर भाष्य करत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपला मोठा रसगुल्ला मिळेल असा टोला त्यांनी लगावला आहे. चंदीपूर येथील एका प्रचारसभेला संबोधित करताना त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी शाह यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

भाजपकडून ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले – ‘शिवसेनेनं आपलं पाप उघड होईल, म्हणून मिठी नदी साफ केली नाही’ (व्हिडीओ)

‘भाजपला मोठा रसगुल्ला मिळेल’

ममता बॅनर्जी Mamata Banerjee  म्हणाल्या, भाजप सर्व जागा जिंकणार असल्याचा दावा का करत नाही. बाकीच्या जागा काय काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षांसाठी सोडल्या आहेत का. या निवडणुकीत भाजपला मोठा रसगुल्ला मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर लगेच भाजप असे दावे का करत आहे, हे समजत नाही. केंद्रीय संस्थांनी उर्वरीत टप्प्यातील मतदान होईपर्यंत तटस्थपणे कामं करावीत. लोकांना भाजपला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करू नये असंही त्या म्हणाल्या आहेत.

संतापलेल्या भाजप खासदार बाबुल सुप्रियोंनी थेट कार्यकर्त्यांच्या श्रीमुखात लगावली, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

काय म्हणाले होते अमित शाह ?

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर अमित शाह यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी भाजप बंगालमध्ये 200 पेक्षा अधिक जागा जिंकेल असा दावा शाह यांनी केला. याच दाव्याला ममता बॅनर्जींनी Mamata Banerjee  उत्तर देत टीका केली आहे.

Also Read

संजय राऊतांचा फडणवीसांवर घणाघात, म्हणाले – ‘राज्यातला नेता जेव्हा वारंवार दिल्लीकडे तोंड करून बघतो’

Video : ‘एवढं तर मी मुख्यमंत्र्यांसाठी देखील करत नाही’, भाजपनं शेअर केला संतापलेल्या नुसरत जहाँचा व्हिडीओ

पवार-शहा भेटीवर भाजपची अधिकृत भूमिका, प्रदेशाध्यक्ष म्हणाले…

शरद पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द, सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीबाबत माहिती

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्दल

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

‘आधी म्हणाले नव्या पिढीला शरद पवार यांचं राजकारण कळणार नाही, आता म्हणत आहेत ‘ती’ फक्त अफवा’

CM उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, केली प्रकृतीची विचारपूस

Related Posts