IMPIMP

ममता बॅनर्जींना मोठा धक्का ! TMC मध्ये उभी फूट; तब्बल 10 आमदार अन् 3 खासदार भाजपच्या संपर्कात ?

by sikandershaikh
west bengal election 2021 mamata banerjee tmc 10 mlas and 3 mps touch bjp

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक (West Bengal Legislative Assembly Election 2021) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी तृ्णमूल काँग्रेस (All India Trinamool Congress – TMC) विरुद्ध भाजप (Bharatiya Janata Party – BJP) अशी थेट लढत या निवडणुकीत होणार आहे. गेल्या काही महिन्यात टीएमसीचे काही नेतेही भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळं टीएमसीच्या अध्यक्षा आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या समोर आता मोठं आव्हान आहे. टीएमसी आज उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. परंतु त्यापू्र्वीच अशी बातमी समोर आली आहे की, ममता दीदींना त्यांच्या पक्षातील आमदार व खासदारांकडून मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जींच्या पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता आहे.

10 आमदार आणि 3 खासदार भाजपच्या संपर्कात

सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की, टीएमसीचे 10 आमदार आणि 3 खासदार भाजपच्या संपर्कात आहेत. पुढील काही दिवसात भाजप या नेत्यांची पार्श्वभूमी तपासून त्यांना पक्षात घेऊ शकतो. सोबतच टीएमसीतून आलेल्या आमदारांपैकी भाजप 2 आमदारांना तिकिट देणार नाही.

टीएमसी करू शकते 294 उमेदवारांची घोषणा

शुक्रवारचा दिवस ममता आपल्यासाठी शुभ आहे असं मानतात. त्या आज सर्वच्या सर्व आमदारांची नावं जाहीर करू शकतात. इतकंच नाही तर त्यावेळी टीएमसी 100 हून अधिक नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्याही विचारात आहे.

प. बंगालमध्ये एकूण 294 जागांसाठी 8 टप्प्यात विधानसभा निवडणूक

1) पहिला टप्पा – 27 मार्च मतदान (30 जागांवर)
2) दुसरा टप्पा – 1 एप्रिल मतदान (30 जागांवर)
3) तिसरा टप्पा – 6 एप्रिल मतदान (31 जागांवर)
4) चौथा टप्पा – 10 एप्रिल मतदान (44 जागांवर)
5) पाचवा टप्पा – 17 एप्रिल मतदान (45 जागांवर)
6) सहावा टप्पा – 22 एप्रिल मतदान (43 जागांवर)
7) सातवा टप्पा – 26 एप्रिल मतदान (36 जागांवर)
8) आठवा टप्पा – 29 एप्रिल मतदान (35 जागांवर)
9) निकाल – 2 मे

सुशांत ड्रग्ज केस ! NCB च्या चार्जशीटमध्ये 33 आरोपींची नावे, 200 पेक्षा जास्त साक्षीदारांचा समावेश

Related Posts