IMPIMP

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

by pranjalishirish
west bengal election 2021 survey claims no one will get majority in bengal tmc bjp left congress

सरकारसत्ता ऑनलाइन टीम : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने प्रचारची रणधुमाळी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपापल्या पक्षांबद्दल जनमत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, एका सर्वेक्षणानुसार भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि सत्ताधारी पक्ष तृणमूल कॉंग्रेस Congress  (टीएमसी) या पक्षा दरम्यान काटे की टक्कर आहे. राज्यात मतदानाच्या पहिल्या टप्प्यापूर्वी झालेल्या सर्वेक्षणात हे उघड झाले आहे.

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

सर्वेक्षणात दावा करण्यात आला की, कठोर स्पर्धेनंतरही कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. सर्वेक्षणानुसार 294 जागांच्या विधानसभेत टीएमसीला 136 ते 146 जागा मिळू शकतात, तर भाजपला 130 ते 140 जागा मिळू शकतात. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी 148 जागांची आवश्यकता आहे.

GROHE Hurun Report : मंगल प्रभात लोढा देशातील सर्वात ‘श्रीमंत’ बिल्डर, जाणून घ्या त्यांच्यासह इतर मोठया ग्रुपच्या संपत्तीबाबत

कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांचे वाईट दिवस !

या निवडणुकांमध्येही कॉंग्रेस Congress आणि डाव्यांचे दिवस वाईट राहतील असा दावा या सर्वेक्षणात करण्यात आला आहे. असा दावा केला गेला आहे की राज्यात कॉंग्रेस Congress आणि डाव्या पक्षांना 14 ते 18 जागा मिळू शकतात आणि इतरांना 1 ते 3 जागा मिळू शकतात. जर ही आकडेवारी आधार म्हणून घेतली गेली तर राज्यात कोणालाही बहुमत न मिळाल्यास कॉंग्रेस, डावे आणि आयएसएफ किंगमेकर होऊ शकतात.

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

राजकीयदृष्ट्या सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यांत मतदान होईल. 29 मार्चच्या विधानसभेसाठी 27 मार्च (30 जागा), 1 एप्रिल (30 जागा), 6 एप्रिल (31 जागा), 10 एप्रिल (44 जागा), 17 एप्रिल (45 जागा), 22 एप्रिल (43 जागा), 26 एप्रिल ( 36 जागा) 29 एप्रिलला ( 35 जागा) असतील. 2 मे रोजी पश्चिम बंगालमध्येही मतमोजणी करण्यात येणार आहे.

Aslo Read : 

खा. नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा शिवसेनेवर वारंवार टीका का करतात?

सबळ पुरावे बंद पाकिटात गृहसचिवांना दिलेत, योग्य कारवाई होईल – फडणवीस

ममता बॅनर्जींनी 10 वर्षांच्या सत्ताकाळात बंगालला कंगाल केले, रामदास आठवले यांची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

फोन टॅपिंग करण्याचा अधिकार फडणवीसांना दिला कोणी; जयंत पाटलांचा सवाल

Related Posts