IMPIMP

खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजे यांच्यात कास धरणाच्या निधीवरून ‘श्रेय’ वाद, जाणून घ्या नेमकं प्रकरण

by pranjalishirish
who take Credit of Kas Dam funds MP Udayan Raje Bhosale and MLA Shivendra Raje Bhosale

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन- खा. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि आ. शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांच्यात कास धरणाच्या निधीवरून श्रेयवाद होताना दिसत आहे. शिवेंद्रराजे भोसले यांनी नमूद केलं की, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांनीच हे काम मार्गी लावलं आहे. तर 57 कोटींची वाढीव निधी देखील त्यांनीच मंजूर केला आहे आणि त्यांनी यासाठी पाठपुरावा केला आहे. तर खा. उदयनराजे यांनी दिलेल्या पत्रकानुसार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर हा निधी वर्ग झाल्याचं सांगण्यात आलं आहे. यावरून आता दोन्ही नेते आणि त्यांच्या आघाड्यांमध्ये श्रेयवाद होताना दिसत आहे. विशेष म्हणजे आगामी काळतही सातारा शहरात या श्रेयवादाचे पडसाद उमटणार आहेत. सातारा शहराची जलवाहिनी असणाऱ्या कास धरण उंचीवाढीचे काम निधी अभावी रखडले होते. शासनानं मंजूर केलेल्या 57 कोटींपैकी बुधवारी 25 कोटींचा पहिला हप्ता सातारा नगरपालिकेकडे वर्ग केला आहे. यावरूनच आता श्रेयवाद उफाळला आहे.

शिवेंद्रराजेंना मोठा राजकीय, सामाजिक वारसा’, त्यांचा भविष्यकाळही उज्ज्वल, मी आयुष्यभर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन’ – रामराजे निंबाळकर

‘शिवेंद्रराजे यांनी पुढाकार घेत अजित पवार यांची भेट घेत या कामासाठी 57 कोटींची निधी मंजूर करून घेतला’

शिवेंद्रराजे यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करत सांगितलं आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून कास धरण उंचीवाढीचं काम मंजूर करून घेतलं होतं. अनेक विभागाच्या परवानग्या घेतल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. सध्या कास धरण प्रकल्पाचं काम 75 ते 80 टक्के झालं आहे. मात्र वाढीव निधीची तरतूद न झाल्यानं गेल्या अनेक महिन्यांपासून पुढील काम रखडलं आणि कास धरण प्रकल्प पूर्णत्वास जाणार का असा सवाल उपस्थित होत होता. यावर तोडगा काढण्यासाठी शिवेंद्रराजे यांनी पुढाकार घेत अजित पवार यांची भेट घेत या कामासाठी 57 कोटींची निधी मंजूर करून घेतला. सातारा शहराची हद्दवाढ आणि मेडिकल कॉलेजचा प्रश्नही सुटला आणि कास धरणालाही वाढीव निधी मिळाला. 57 पैकी 25 कोटींचा पहिला हप्ता पालिकेकडे वर्ग झाला आहे. त्यामुळं कास धरणाचं रखडलेलं काम पूर्णत्वास जाण्यास मदत होणार आहे.

वडिल राजेंद्र पवारांना ‘कृषीरत्न’ जाहीर होताच पुत्र आमदार रोहित यांचे ‘हे’ ट्विट चर्चेत

‘उदयनराजे भोसले यांच्या रेट्यामुळंच कास धरण उंची वाढवण्याच्या कामाला 57 पैकी 25 कोटी रुपये मिळाले’

खा. उदयनराजे भोसले  Udayanraje Bhosale यांच्या रेट्यामुळंच कास धरण उंची वाढवण्याच्या कामाला सुधारीत प्रशासकीय मंजुरीनुसार सातारा नगरपालिकेला 57 पैकी 25 कोटी रुपये मिळाले आहेत अशी माहिती जलमंदिर पॅलेस येथून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. यात म्हटलं आहे की, कास धर उंचीवाढीसाठी उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कास धरणासह इतर कामाबाबत प्रस्ताव दिले होते. कास तलावाची उंची वाढवण्याच्या अनेक अडथळ्यांवर नियमानुसार मार्ग काढत या कामाला उदयनराजेंमुळं सुरुवात झाली. या योजनेची सुधारीत प्रशासकीय मंजुरीसुद्धा डिसेंबर 2020 मध्ये मिळवण्यात आली. धरणाचं काम निधीअभावी रखडल्यानंतर खा. उदयनराजेंनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या कामासाठी निधी वितरीत करण्याची मागणी केली होती, त्यानुसार हा निधी मंजूर झाला आहे. कास धरणाची उंची वाढवून साठवण क्षमता वाढवून पाणीपुरवठा करता येण्यासाठी कास धरण उंची वाढवण्याचा प्रस्ताव प्रथम उदयनराजेंनीच मांडला. सध्या कास धरण उंची वाढवण्याच्या प्रकल्पाचं सुरू झालं असून 75 ते 80 टक्के काम पू्र्ण होत आलं आहे. येत्या काही दिवसात उर्वरीत काम पूर्ण केलं जाईल.

Also Read:

गृहमंत्री देशमुखांवर 100 कोटीच्या हप्ता वसुलीचा आरोपानंतर आता चौकशी समितीवरून ‘कलगीतुरा’, सत्ताधारी-विरोधक ‘आमनेसामने’

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका ! ‘हा’ ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज IPL च्या बाहेर

Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयीन समितीची 18 राज्यातील 85 शेतकरी संघटनांसोबत चर्चा, अहवाल सुप्रीम कोर्टात सादर; लवकरच होणार सुनावणी

निवडणुकीच्या भीतीमुळे मोदी-शहा सरकारने निर्णय बदलला’, PPF वरील व्याजदर जैसे थे !

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे स्पष्टीकरण, म्हणाल्या – ‘PPF वरील व्याजदर जैसे थे, तो आदेश नजरचुकीने निघाला’

Lockdown ला विरोध करणाऱ्यांना संजय राऊतांनी सुनावले, म्हणाले -‘लॉकडाऊनचे राजकारण करु नका’

Related Posts