IMPIMP

राजीव सातव यांच्या जागेवर आता कोण? ‘राहुल-प्रियांका’ यांच्यात नावावरून मतभेद

by omkar
Rajiv Satav यांच्या जागेवर आता कोण? राहुल-प्रियांकात मतभेद

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन – वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांचं कोरोनामुळं निधन झालं. राजीव सातव हे गुजरातचे काँग्रेस प्रभारी होते. त्यामुळे आता गुजरात काँग्रेस (Gujarat Congress) प्रभारी पदी कोणाची नेमणूक होणार याकडं नेते मंडळींचं लक्ष लागलं आहे.

सातव यांच्या जाण्यामुळं दोन पदे रिकामी झाली आहेत. राज्यसभेतील सदस्यत्व आणि गुजरात काँग्रेस (Gujarat Congress) प्रभारी, या दोन्ही जागेवर काँग्रेसमधील नेते आता कोणाची वर्णी लावत आहेत हे पाहणे औत्सुक्याचे ठरले.

नारायण राणेंच्या टीकेनंतर खा. संभाजीराजेंचं सूचक ट्वीट, म्हणाले…

दरम्यान, सातव (Rajiv Satav) यांच्या जागी महाराष्ट्र काँग्रेसमधील दोन नावांची विशेष चर्चा आहे.
गुजरातमध्ये नवीन काँग्रेस प्रभारी कोण असेल? या विषयी काँग्रेस पक्षात उच्चस्तरीय बैठका सुरू आहेत.
राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि अशोक गहलोत या तिघांनी मिळून काही नावं काढली असल्याचे आता सांगण्यात येत आहे.
यामध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे महासचिव मुकुल वासनिक आणि माजी महासचिव अविनाश पांडे या दोघांची नावे जास्त चर्चेत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी अविनाश पांडे यांच्या नावाला पसंती देत आहेत.
पांडे हे सोनिया गांधींच्या विश्वासातले असल्याचे मानलं जातं.
महत्त्वाचे म्हणजे राजस्थान काँग्रेसच्या प्रभारी पदी असताना त्यांनी सचिन पायलट यांची पक्षातील दगाबाजीची खेळी हाणून पाडण्यात महत्त्वाचं योगदान दिलं होतं.
याच कारणामुळं अशोक गेहलोत यांचादेखील अविनाश पांडे यांना पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांवेळी अविनाश पांडे यांना सोनिया गांधींनी वॉररूमचे प्रभारी बनवले होते.
त्यावेळी शिवसेनेसोबत सरकारमध्ये सामील होण्यासाठी अविनाश पांडे आणि अशोक गेहलोत या दोघांनीच सोनिया गांधी यांच मन वळवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
पांडे यांच्या देखरेखीखालीच महिनाभर महाराष्ट्रातील काँग्रेसचे आमदार जयपूरमध्ये सुरक्षित होते. त्यांची सर्व व्यवस्था करण्याची जबाबदारी पांडे यांच्यावर होती.
त्यामुळे पांडे यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याचं सांगण्यात येत आहे.

प्रियांका गांधी या मुकुल वासनिक यांच्या नावाच्या बाजूने आहेत.
मुकुल वासनिक यांचे पक्षातील संघटनात्मक काम महत्त्वाचं आहे.
सुरुवातीपासूनच ते काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते राहिले आहेत.
मात्र, गुजरात काँग्रेसमधील वाद-विवाद सोडवून स्थानिक पातळीवर नेत्यांचे मनोमिलन घडवून आणण्यामध्ये ते फार प्रभावी ठरतील असं दिसत नाही.
त्यांना गुजरात आणि तेथील राजकीय स्थिती समजून घ्यायला बराच वेळ लागेल, पण सध्या फार वेळ घालवण्याची स्थिती नाही, कारण पुढल्याच वर्षी गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.
या दोघांशिवाय निरज डांगी, माजीमंत्री रघुवीर सिंग मीना आणि हर्षवर्धन सपकाळ यांचीही नावे चर्चेत आहेत, मात्र यातील कोणाची निवड झाल्यास प्रभारी पद दोघांकडे विभागून देण्यात येण्याची शक्यता आहे.

अविनाश पांडे हे एकदा राज्यसभा खासदार झाले होते. राजीव सातव यांच्यामुळे राज्यसभा सदस्य पदाच्या रिकाम्या झालेल्या जागेवर विशेष करून मुकुल वासनिक यांचीच खरी नजर आहे. आनंद शर्मा हे देखील निवृत्त होत आहेत त्यांच्या बदली मुकुल वासनिक चेहरा पुढे येण्याची शक्यता आहे. सध्या काँग्रेसमध्ये एखादा ब्राह्मण चेहरा राज्यसभेमध्ये पाठवण्याचा विचार होत आहे.

Also Read:- 

Devendra Fadnavis : ‘राज्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि 5 सुपर मुख्यमंत्री’ (व्हिडीओ)

2 महिन्यांपेक्षा अधिक जास्तीचं भाडे घेता येणार नाही, नव्या घरभाडे कायद्यामध्ये आता घरमालकाचा समावेश

Internet Media : ‘ईस्ट इंडिया कंपनी’प्रमाणे वागू शकत नाही इंटरनेट मीडिया : केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल सतत होतंय महाग, मोडले सर्व रेकॉर्ड

गरीब, वंचितांसाठी मोदी सरकारचं विशेष अभियान ! बनवणार 2 कोटी रेशन कार्ड; जाणून घ्या

जाणून घ्या 4 जूनचे राशीफळ ! 7 राशींसाठी खास दिवस

पुणे महापालिकेत महापौर अन् सभागृहनेते यांच्यात ‘खडाजंगी’ !

Related Posts