IMPIMP

पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार ? भाजप खासदार, आमदारांची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय

by amol
will there be a political earthquake in satara and sangli bjp mps and mlas are closer to ncp

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)विधानसभा निवडणुकीच्यावेळी सत्तेसाठी भाजपमध्ये दाखल झालेले नेते राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा स्वग्रही परतण्याच्या तयारीत आहेत. अनेक नेते आपल्या मुळ पक्षाशी जवळीक वाढवताना दिसून येत आहेत. भाजपचे सांगलीचे खासदार संजय काका पाटील आणि सातारचे शिवेंद्रराजे भोसले यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु हे दोन्ही नेते भाजपमध्येच राहणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या दोन नेत्यांची राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांसोबत वाढत असलेल्या भेटीगाठीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.

सांगलीचे भाजपचे खासदार संजय काका पाटील सध्या पक्षाच्या कार्यक्रमात कमी आणि राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर अधिक दिसत आहेत. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सोबत मांडीला मांडी लावून बसत असल्याने सांगलीच्या राजकारणात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले संजय काका पाटील यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. आता राज्यात सत्तांतर झाल्याने संजय काका पाटील पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, या सर्व चर्चांवर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सांगली नंतर साताऱ्यातील शिवेंद्रराजे भोसले यांच्या देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांशी भेटीगाठी वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी बारामती गाठली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सातारा दौऱ्यावर असताना त्यांच्या स्वागताला उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शशिकांत शिंदे यांच्याशी संघर्षाची भाषा करणारे शिवेंद्रराजे अलिकडच्या काळात त्यांच्याबाबतीत मवाळ झाल्याचे पहायला मिळत आहे.

दरम्यान, दोन्ही नेत्यांची राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पक्षांच्या नेत्यांसोबत वाढत्या भेटीगाठींवर भाजपने
प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, त्यांचे जुन्या संबंधामुळे त्यांच्यात भेटीगाठी होत आहेत.
काँग्रेसमधील गोंधळाला कंटाळून आणि शरद पवार यांच्या वयाकडे पाहून हे नेते भाजपमध्ये आले आहेत.
ते भाजप सोबतच कायम राहतील असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या अधिक होती.
मात्र, राज्यातील भाजपची सत्ता गेल्याने सत्तेत राहण्याची सवय लागलेल्या नेत्यांनी विकास कामांच्या
नावाखाली सत्ताधारी पक्षातील नेत्यांसोबत जवळीक वाढवली आहे.
त्यातच येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधून सत्ताधारी पक्षात प्रवेश करणाऱ्या
आजी-माजी पदाधिकऱ्यांची संख्या वाढल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
त्यातच सातारा आणि सांगलीतील दोन दिग्गज नेत्यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत जवळीक वाढल्याने
आगामी काळात पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Related Posts