IMPIMP

‘अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु, CBI ने कारवाई करावी’

by pranjalishirish
work underway destroy evidence worth rs 100 crore anil deshmukhs residence cbi should take action Atul Bhatkhalkar comment

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याला 100 कोटी रुपये वसुली करण्याचे टार्गेट दिले होते, असा खळबजनक आरोप परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला होता. यावरुन महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले होते. विरोधकांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. दरम्यान, परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मुंबई उच्च न्यायालयाने अॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश सीबीआयला दिले. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला. परंतु, या राजीनाम्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर Atul Bhatkhalkar  यांनी अनिल देशमुख यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे.

शिवसेनेचे धारदार बाण ! म्हणाले – ‘देशातील निवडणूक आयोग ‘मृत’, EC ची भूमिका संशयास्पद’

उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे निर्देश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर Atul Bhatkhalkar  यांनी अनिल देशमुख यांच्यावर ट्विट करुन आरोप केला आहे. भातखळकर म्हणतात, मी अत्यंत जबाबदारीने सांगू इच्छितो की, नुकताच राजीनामा दिलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थानी आणि कार्यालयात असलेले 100 कोटींच्या प्रकरणासंदर्भातील पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु आहे. सीबीआयने तातडीने आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.

वाझेला पाठीशी घालणारा एक मंत्री कमी झाला

अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर अतुल भातखळकर Atul Bhatkhalkar  यांनी ट्विट करुन ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा ठाकरे सरकारची घसरलेली पत दाखवतो. सचिन वाझेला पाठीशी घालणारा एक नेता मंत्रिमंडळातून कमी झाला, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.


‘अनिल देशमुख यांना शरद पवारांचा आशीर्वाद असला तरी…’

काय आहे 100 कोटींचे प्रकण ?

परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे व अन्य पोलीस अधिकाऱ्यांना दरमहा 100 कोटी जमा करण्याचे टार्गेट दिले होते. हे पैसे बार, रेस्टॉरंट व अन्य आस्थापनांकडून कमावण्याीच सूचना केली होती. तसेच पोलीस बदल्यांत आणि पोस्टिंगमध्येही भ्रष्टाचार होतो. तपासात राजकारण्यांचा हस्तक्षेप होत असल्याचे याचिकेत नमूद केले आहे.

Also Read :

मोठी बातमी ! अजितदादांना बालेकिल्ल्यातच शह देणार शिवसेना ?

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला अखेर भाजपचा पाठिंबा पण…

Hasan Mushrif : ‘फडणवीसांना राज्यसभेत पाठवून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार, चंद्रकांत पाटील हे नागपुरातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा’

Param Bir Singh : उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

‘त्या’ आदेशावरुन काँग्रेसकडून आदित्य ठाकरे ‘निशाण्या’वर, राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी (व्हिडीओ)

Devendra Fadnavis : ‘नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार शरद पवारांचा’ (व्हिडीओ)

हफ्ता वसुलीवर चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘इयत्ता 8 वीचा विद्यार्थीही सांगेल सरकार प्रकरण दाबतंय’

राज्यातील गंभीर प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची भूमिका मुख्यमंत्रीपदाला शोभत नाही, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा’

PM मोदी, HM शहांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यावर टीका, टीका करताना फडणवीस-पाटलांनी भान ठेवावे, नाहीतर…

Related Posts