IMPIMP

राष्ट्रवादीत येणार्‍यांना जितेंद्र आव्हाडांचा इशारा; म्हणाले – ‘पुढच्या बाकावर बसायला मिळणार नाही’

by sikandershaikh
jitendra awhad

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)भाजपामध्ये गेलेले अनेक नेते पुन्हा स्वगृही परतण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष सोडून गेलेल्या ठाणे जिल्ह्यातील काही नेत्यांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी कानपिचक्या दिल्या. आव्हाड म्हणाले, आघाडीचे सरकार असताना माजी मंत्री स्वर्गीय नेते आर. आर. आबा आणि मंत्री अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणात लक्ष या भागासाठी दिले. नेवळी फाटा ते बदलापूरचा टर्न या भागात एकही खड्डा नाही. त्यावेळी, कथोरेंना प्रचंड पैसा या दोन्ही नेत्यांनी दिला. या असल्या लोकांनी आमचा पक्ष का सोडला हेच समजत नाही. अशा नेत्यांना पुन्हा पक्षात यायचं असेल तर स्वागत करू… पण पहिल्या बाकावर बसायला मिळणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ठाणे आणि नवी मुंबईतील कार्यक्रम आणि उद्घाटन सोहळ्यांना हजेरी लावली. यावेळी, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. यावेही अंबरनाथ-बदलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात आव्हाड बोलत होते.

स्थानिक राजकारणावर बोलताना आव्हाड म्हणाले, ठाणे जिल्ह्यातील कथोरेंविरुद्धची लढाई ही प्रामाणिक विरुद्ध गद्दार अशीच असावी. कारण, त्यांचा अपमान होईल, असे ना शरद पवार वागले, ना आर. आर. पाटील वागले ना अजित पवार. ते काम करणारे आमदार होते, यात शंका नाही. पण, कामासाठी सहकार्य करणारा राष्ट्रवादी पक्ष तुमच्या पाठिशी उभा होता हे तुम्ही कसे विसरलात ? कार्यकर्त्यांच्या मनात ही सल असते. केवळ एका तिकीटासाठी तुम्ही भाजपात गेला. त्यामुळेच, आशिष दामलेंसारख्या युवकांनी स्थानिक निवडणुका गांभीर्याने घ्याव्यात.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना इशारा देताना आव्हाड (jitendra awhad) म्हणाले, भाजपात कोण गेले ते परत येतील, मग त्यांना महत्त्वाचे स्थान मिळेल, असा विचार करु नका.
त्यांना ते स्थान अजिबात देणार नाही.
माझे तर स्पष्ट मत आहे, ते मी पवारसाहेब आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे व्यक्त केले आहे.
येणार्‍यांनी यावे, आम्ही सर्वांचे स्वागत करु, तुम्ही आमच्याच घरातले आहात.
पण, पुढच्या बाकावर बसायला मिळेल, हा विचार करुन येऊ नका.
थोडे दोन वर्षे तुम्हाला वेटींग करावे लागेल, असे इशारा आव्हाड यांनी दिला.
जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून सुद्धा केंद्र सरकारवर टीका केली तसेच
शेतकरी आंदोलन आणि सरकारी कंपन्या विकण्याचा मोदी सरकारने लावलेला सपाटा, यावर देखील निशाणा साधला.
ज्या संविधानामध्ये आपल्याला भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आला आहे, त्याच संविधानातील अधिकार काढण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत.
आंदोलनजीवी को रोखना होगा, याचा अर्थ काय? असा प्रश्न त्यांनी विचारला.

Related Posts