IMPIMP

दुर्दैवी ! फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

by pranjalishirish
accidental death cantonment board officer prakash hasbe pune

पुणे: येथील कॅम्पमधील फॅशन स्ट्रीटला Fashion Street शुक्रवारी रात्री लागलेली आग अग्निशमन दलाने २ तासाच्या अथक परिश्रमानंतर विझवली. यावेळी  आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करणारे  आणि अनेकांचे जीव वाचवणाऱ्या कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा घरी जाताना दुर्दैवी मृत्यू झाला. प्रकाश हसबे Prakash Hasbe असे त्यांचे नाव आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि कुटूंबीयांच्या नावे संपत्ती किती? जाणून घ्या

कॅम्प मधील फॅशन स्ट्रीटला Fashion Street शुक्रवारी रात्री ११ वाजता आग लागली. हि आग इतकी मोठी होती कि सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. त्यानंतर कॅम्प सहीत पुणे शहरातील अग्निशमन दलाचे कर्मचारी देखील घटनास्थळी पोहोचले. हि आग विझवण्यासाठी १५ बंब घटनास्थळी दाखल झाले होते.  आग विझवण्याच्या मोहिमेत सर्वात पुढे होते पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या  अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश हसबे Prakash Hasbe  होते. दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर हि आग विझवण्यात आली.

त्यानंतर सकाळी या सपूर्ण घटनाक्रमाचा आढावा घेऊन हसबे Prakash Hasbe  आज सकाळी घरी निघाले होते. तत्पूर्वी त्यांनी दोन तासात पुन्हा कामावर येतो असे कर्मचाऱ्यांना  सांगून ते कॅम्प येथून निघाले. येरवडा मार्गावरून घरी जात असताना रस्त्यात त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला. या घनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शिवसेनेची खरमरीत टीका; ‘भाजप मृतांच्या टाळूवरचे लोणी खायला विसरत नाहीत’

काही दिवसापूर्वी कॅम्प परिसरात आग लागली होती. येथील  शिवाजी मार्केटमध्ये

हि आग लागली होती.  फॅशन स्ट्रीट Fashion Street हे पुण्यातील प्रसिद्ध कपड्यांचे मार्केट आहे. आगीत व्यपाऱ्यांचे लाखोंचे रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान आगीमागील कारण अस्पष्ट आहे. काही दिवसापासून हे मार्केट येथून हलवण्याचे सुरु आहे. त्यामुळे हि आग लागली कशी याची  चौकशी करण्यात यावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

या आगीसंदर्भात बोलताना एका व्यापाऱ्याने सांगितले की,  या परिसरात खाद्य पदार्थाचे गाडे  अथवा दुकान नाही, साधी चहाचि टपरी नाही. त्यामुळे इथं आग लागली कशी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आग लागलायचे समजताच आम्ही घटना स्थळी पोहोचलो आणि तत्काळ फायर ब्रिगेडला कळवले. मात्र फायर ब्रिगेड इथे जवळपास दीड तासाने दाखल झाले. त्यामुळे जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची आवश्यकता  आहे. असे काही व्यापाऱयांनी सांगितले.

छगन भुजबळांचं थेट रस्त्यावर उतरून लोकांना आवाहन, म्हणाले – ‘…अन्यथा LockDown शिवाय कुठलाही पर्याय नाही’

या आगीत संपूर्ण मार्केट जाळून खाक झाले आहे. २००० च्या वर कपडे, चप्पल, गॉगलची दुकाने आहेत.  एम जी रोड वरील व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी वर्षभरासाठी २००० साली जुने कांबळे मैदान म्हणजे आजचे फँशन स्ट्रीट या ठिकाणी जागा देण्यात आली. पूर्वी येथे ४०० व्यापारी होती आता हि संख्या वाढली आहे. दोन हजाराहून अधिक व्यापारी आहेत. अनेक व्यापारी संघटना अस्तित्वात असून  काहींनी  पार्किंगमध्येही  अतिक्रमण करत दुकाने थाटण्यात आली होती.

Also Read : 

Coronavirus in Maharashtra : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी CM ठाकरेंचा मोठा निर्णय ! राज्यात रविवारपासून रात्रीची संचारबंदी

‘एप्रिल फूल’ समजू नका, नियम न पाळल्यास कठोर निर्णय घेणार : अजित पवार

जितेंद्र आव्हाडांचं ‘प्रत्युत्तर’, म्हणाले – ‘फडणवीसांनी ‘हे’ मान्य केलं तेच खूप झालं’

फोन टॅपिंग अहवाल लीक : रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणात गुन्हा दाखल, सायबर सेल करणार पहिल्यांदा तपास

Related Posts