IMPIMP

Action On Cosie and Blak Clubs in Pune | पुणे : उत्पादन शुल्क विभागाची ‘कोझी’ अन् ‘मॅरियट सूट- ब्लॅक’ पब वर कारवाई, दोन्ही पब्स बंद करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश (Video)

by sachinsitapure

पुणे :  – Action On Cosie and Blak Clubs in Pune | कल्याणी नगर परिसरात अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात गाडी चालवीत केलेल्या अपघातात दोघांचा बळी गेला (Kalyani Nagar Pune Accident). त्यापूर्वी अल्पवयीन मुलाने ब्लॅक इन मेरिएट सुट्स आणि कोझी रेस्टॉरंटमध्ये पार्टी केली होती. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ब्लॅक पब बारवर कारवाई केली आहे. त्यानंतर आता हे दोन्ही पब्स बंद करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी (Pune Collector) यांनी दिले आहेत. तसेच नियम उल्लंघन करणाऱ्या इतर आस्थापनांवर देखील कारवाई करण्याचे आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, मुंबई यांनी निर्देश दिले आहेत.

पोर्शे कार अपघातात गुंतलेल्या कथित अल्पवयीन मुलांना दारू पुरवल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने नोंदवलेल्या नियम उल्लंघनाच्या प्रकरणात हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड (कोझी) आणि पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर (ओक वुड) मॅरियट सूट- ब्लॅक या दोन्ही हॉटेल/ परमिट रूम/पब आस्थापनांचे व्यवहार तात्काळ प्रभावाने पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने बंद करण्यात आल्या आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने, पुणे शहरातील सर्व पब्ससह इतर परमिट रूम ची विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत प्रामुख्याने पुढील मुद्यांवर शहरातील पब्स व इतर बार/परमिट रूम्स यांची तपासणी करण्यात येत आहे…

– परवानाधारक अल्पवयीन मुलांना कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करू नये.
– परवानाधारकाने पहाटे 1.30 नंतर (दिलेली वेळ) कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करू नये.
– परवानाधारक महिला वेटर्समार्फत उत्पादन शुल्क विभागाच्या नोकरनामा शिवाय आणि रात्री 9.30 नंतर कोणतीही विदेशी दारू सर्व्ह करू शकणार नाही.
– आणि जर बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट-1949 आणि बॉम्बे फॉरेन लिकर रुल्स-1953 अंतर्गत येणाऱ्या विविध तरतुदी आणि नियमांचे उल्लंघन केले असेल तर त्या आस्थापनांवर नियमानुसार गुन्हे नोंद केले जातील. तसेच जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार या मद्य विक्री लायसन्स निलंबित अथवा रद्द केले जाईल. असे विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे सागर धोमकर यांनी कळवले आहे.

न्यायालयात आरोपपत्र दाखल

हॉटेल मेरिएट सुट्सच्या ब्लॅक नावाच्या पबमध्ये अल्पवयीन मुलांना दारू विकली जात असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पंचशील इन्फ्रास्टक्चरचे मालक सागर चोरडिया आणि कोझी बारचे मालक प्रल्हाद भुतडा यांच्याविरुद्द न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. राज्य उत्पादन विभागाने १७ ते १९ मे या कालावधीत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली होती. त्यामध्ये अल्पवयीन मुलांना दारू दिल्याचे त्यामध्ये दिसले होते. बारमध्ये कोण येतात याबाबतच्या नोंदीही येथे नसल्याचे आढळले. विभागाच्या नियमानुसार रजिस्टर ठेवणे आवश्यक होते. ते नसल्यामुळे चोरडियांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे.

Kalyani Nagar Pune Accident | पुणे हिट अँड रन प्रकरण : ‘मी दारु पितो, पप्पांनीच मला गाडी दिली’ आरोपी मुलाचा कबुली जबाब

Related Posts