Ajit Pawar On Atul Benke | अतुल बेनके आणि शरद पवार यांच्या भेटीवर अजित पवार म्हणाले – ‘…अजून बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील’
पुणे: शरद पवार हे उत्तर पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी भेट दिली. दरम्यान अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेत चर्चा केल्याने बेनके येणाऱ्या काळात तुतारी हातात घेतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालेली आहे. (Ajit Pawars Reaction On NCP MLA Atul Benke Meeting With Sharad Pawar)
या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ” निवडणूक जवळ आल्यानंतर काहींना उभं राहायचं असतं. त्यावेळी आता ही जागा आमच्या पक्षाला सुटणार नाही त्याऐवजी दुसऱ्या पक्षात जायचं. कारण आज भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची युती आहे. समोर काँग्रेस , शरद पवार राष्ट्रवादी आणि उठाबा शिवसेना अशी युती आहे.
जिथे एका पक्षाला जागा जाईल तेथील इतर पक्षांची लोकं काहीही झालं तरी निवडणुकीला उभं राहायचं म्हणत इकडची तिकडं जाणार तर तिकडची इकडं येणार ही सुरुवात आहे. अजून तर बरेच दिवस जायचे आहेत. अजून बऱ्याच काही गोष्टी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील, असे अजित पवार यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर अजित पवार गटाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. अजित पवार यांच्या पिंक पॉलिटिक्सची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
Comments are closed.