IMPIMP

Ajit Pawar Prakash Ambedkar | राष्ट्रवादीचा प्लॅन बी तयार; प्रकाश आंबेडकर आणि अजित पवार एकत्र येण्याचे संकेत?

by sachinsitapure

पुणे: Ajit Pawar Prakash Ambedkar | लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) कडून मोठा फटका बसला आहे. ४८ पैकी ३१ मतदारसंघात मविआ चे उमेदवार तर महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या. महायुतीत भाजपाला ९, शिंदे गट ७ आणि अजित पवार गटाला अवघी एक जागा मिळाली. लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर महायुतीत अजित पवारांवर सातत्याने टीका केली जात आहे.

दरम्यान अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजित पवारांनी महायुतीत राहू नये असा काही जणांचा प्रयत्न असल्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले. काही आमदारांचे म्हणणे महायुतीत लढणे आहे तर काहीजण स्वबळावर लढू म्हणत असल्याचे मिटकरी म्हणाले. तर पुढील राजकीय गणितं काय असतील याबाबतही त्यांनी भूमिका मांडली आहे.

जर ५०-५५ जागांवर राष्ट्रवादीची बोळवण होणार असेल तर स्वतंत्र लढण्याची भूमिका पक्ष घेऊ शकतो. हा निर्णय वरिष्ठ पातळीवरचा आहे. अजित पवार एकटेच आहेत आणि एकटेच लढतील असे मित्रपक्षांनी समजू नये. राजकारणात काहीही होऊ शकतं असे मिटकरींनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर आणि अजित पवार ही जोडी पुढे आली तर यापेक्षा गोड क्षण आमच्यासाठी नसेल. महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकरांना त्रास दिला म्हणून त्यांना निघून जावं लागलं. प्रकाश आंबेडकर आणि अजित पवार खांद्याला खांदा लावून एकत्र लढले तर महाराष्ट्रात चित्र वेगळे दिसेल असे अमोल मिटकरींनी सांगितले.

Related Posts