IMPIMP

Ajit Pawar | पुणेकरांना आणखी दिलासा मिळणार ! सर्व व्यवहार रात्री 8 पर्यंत सुरु?

by nagesh
ajit pawar thoughts relax restrictions pune all transactions will be done till 8 pm

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज पुणे मेट्रोच्या कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पुण्यातील निर्बंध शिथिलबाबत भाष्य केलं आहे. जिथे 4 वाजेपर्यंत वेळ दिली आहे तिथे ती 8 वाजेपर्यंत वेळ करण्यात येईल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. ज्या ठिकाणी पॉझेटिव्हिटी रेट एखादा टक्का असेल तिथे निर्बंध कमी करण्याचा विचार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याला होकार दर्शवला असल्याचं देखील अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

आज (शुक्रवारी) नियमाप्रमाणे अजितदादांची (Ajit Pawar) पुण्यात कोरोनाबाबत आढावा बैठक असते. त्यातच आज पुणे मेट्रोच्या (Pune Metro) कार्यक्रमासाठी देखील पवार उपस्थित राहिले. त्यावेळी सरकारही कोरोनाचे निर्बंध शिथील करण्याचा विचार करत असल्याची माहिती अजित पवारांनी त्यावेळी दिली आहे. दरम्यान, लोक सोमवार ते शुक्रवार काम करतात, त्यामुळे शनिवार आणि रविवार मोकळीक हवी आहे. याचा देखील विचार सुरू आहे. परंतु, निर्बंध शिथिल झाले तरी देखील मास्क, सॅनिटायझर, गर्दी नाही हे नियम पाळावेच लागतील असं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

Web Title : ajit pawar thoughts relax restrictions pune all transactions will be done till 8 pm

हे देखील वाचा :

Pune News। पुण्यातील महिला पोलिस उपायुक्तांच्या ‘त्या’ गृहमंत्र्यांकडून गंभीर दखल

Pune Crime | तक्रार दिल्याच्या रागातून महापालिका अभियंता व ठेकेदाराकडून मारहाण

Crime News | खळबळजनक ! महापौराची गोळ्या झाडून हत्या; भाजप आमदाराचं कनेक्शन?

Related Posts