IMPIMP

Amruta Fadnavis | ‘गणेश चतुर्थीच्या अगोदर माझं एक गाणं येणार’

by nagesh
Amruta Fadnavis | dcm devendra fadnavis wife amruta slams trollers say she only fears her mother in law

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)–   कोरोना संसर्गात (Corona virus) घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तसंच, महापालिकांना आपापल्या ठिकाणची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यास सांगण्यात आलं आहे. त्यानंतर मुंबई महापालिकेनं शहरातील बहुतांशी निर्बंध उठवले आहेत. पुण्याच्या (Pune) बाबतीत मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी नाराजी व्यक्त करत, पुणेकरांना धरणे आंदोलन करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी त्यांनी (Amruta Fadnavis) आपलं नवीन गाणं येत असल्याची देखील घोषणा केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) ह्या आज (गुरूवारी) पुण्यात हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमाला आले होते. यावेळी प्रदर्शनाचे उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाले. यांनतर त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला. आता कोणत गाणं येणार आहे अशी विचारणा करण्यात आल्यांनतर अमृता फडणवीस म्हणाल्या की, ‘गणेश चतुर्थीच्या आधी माझं एक गाणं येणार आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. त्यांनतर त्यांना माध्यमांनी गाणं सादर करण्याचा आग्रह केला त्यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या, (स्टेजकडे बोट करीत) ‘मी तिथे म्हटलं असतं, इथं ही वेळ नाही. तुम्ही मला एकदम सिरीयस प्रश्न विचारता आहात. पुढील वेळी हलकं फुलकं विचाराल, तेव्हा बघू… पुढच्या वेळी शंभर टक्के नक्की, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आई.

या दरम्यान बोलताना पुढे त्या म्हणाल्या की, ‘पुण्यात बाधित रुग्णांचा दर 4 असून, तरी देखील मॉल्स आणि इतर सर्व बंद आहे. लोकांना 4 पर्यंतची वेळ पुरेशी नाही. म्हणून, रस्त्यावर गर्दी होत आहे. वेळ अधिकची देण्यात आली असती, तर नागरिकांनी गर्दी केली नसती. परंतु, लोकांनी नियम पाळून खरेदी करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं. दरम्यान, मुंबईत डेथ रेट जास्त असताना देखील तिथे एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? असा सवाल देखील अमृता फडणवीस यांनी त्यावेळी उपस्थित केला आहे.

Web Title : Amruta Fadnavis | pune lockdown covid restrictions continue in pune update amruta fadnavis uddhav thackeray

हे देखील वाचा :

Mumbai Local Train | मुंबई लोकलबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे याचं मोठं विधान; म्हणाले…

Yuvasena President | आदित्य ठाकरे युवासेना पदावरून पायउतार होणार?; ‘या’ खास शिलेदाराकडे जाणार युवासेनेची जबाबदारी

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! शुक्रवारी ‘या’ वेळेला 3 तासासाठी बंद राहिल बँकेची ‘ही’ सर्व्हिस, चेक करा टायमिंग

Pimpri Crime | वाहनचोर जोमात, पिंपरी-चिंचवड शहरातून 6 दुचाकी चोरीस

Related Posts