IMPIMP

Anand Nagari Sahakari Pathsantha Shirur Scam | पुणे : शिरुर येथील आनंद पतसंस्थेत कोट्यवधीचा घोटाळा, अध्यक्षासह 14 जणांवर FIR

Cheating Fraud Case
July 10, 2024

पुणे : – Anand Nagari Sahakari Pathsantha Shirur Scam | शिरुर येथील आनंद नागरी पतसंस्थेच्या चेअरमन, व्यवस्थापक व इतरांनी तब्बल 16 कोटी 70 लाख 54 हजार 361 रुपयांचा अपहार करुन ठेवीदारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे (Cheating Fraud Case). याप्रकरणी पतसंस्थेचे चेअरमन अभयकुमार चोरडिया यांच्यासह व्यवस्थापक व अन्य 14 जणांवर शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शासकीय अधिकाऱ्याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 31 डिसेंबर 2013 ते दि. 20 फेब्रुवारी 2020 या कालावधीमध्ये शिरुर येथील आनंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेमध्ये अध्यक्ष अभयकुमार पोपटलाल चोरडिया (Abhaykumar Popatlal Chordiya) आणि इतर त्यांचे साथीदार प्रविण चंपालाल चोरडीया (Pravin Champalal Chordiya), मुरसलीन वहिंद मोहमद, सनी धरमचंद चोरडीया (Sunny Dharmchand Chordiya), सविता अभयकुमार चोरडिया (Savita Abhaykumar Chordiya), सुजाता नितीन चोरडिया (Sujata Nitin Chordiya), प्रितम प्रवीण चोरडिया (Pritam Pravin Chordiya), पारसबाई पोपटलाल चोरडीया (Parasbai Popatlal Chordiya), चंपालाल बुधमल चोरडिया (Champalal Budhmal Chordiya), सुरेंद्रकुमार रतनलाल चोरडिया (Surendrakumar Ratanlal Chordiya), संस्था व्यवस्थापक शांताराम गंगाधर देवकर (Shantaram Gangadhar Devkar) या व्यक्तींनी चाचणी लेखापरीक्षणानुसार संस्था कामकाजात निदर्शनास आलेल्या गंभीर बाबी, अपहार, अफरातफर, अनियमितता करुन संस्था सभासदांचा व ठेवीदारांचा विश्वासघात व फसवणूक केली आहे.

कशी केली अफरातफर

सरिता ब्रिजमोहन सिंह, सनदी लेखापाल, नागेंद्र एच. सोरटे, प्रामाणिक लेखापरीक्षक अजय एच. सोरटे, प्रामाणिक लेखापरीक्षक यांनी संगनमत करुन वरील कालावधीत स्वत:च्या फायद्यासाठी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवींची रक्कम ही स्वत:चे फायद्यासाठी आपल्याच फर्मच्या नावे कर्ज वितरण करुन ठेवीदारांची 16 कोटी 70 लाख 54 हजार 361 एवढ्या रक्कमेचा अपहार केला. आरोपींनी ठेवीदारांचा विश्वासघात केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुजावर करीत आहेत.