IMPIMP

Anti Corruption Pune-Pimpri | यापूर्वीही काही प्रकरणात स्वीकारली होती ‘लाच’; पिंपरी मनपा स्थायीचे नितीन लांडगे यांच्या PA च्या केबिनमध्ये आढळले ‘बेहिशोबी’ 8.5 लाख, अ‍ॅड. लांडगे, पिंगळे यांच्या घराची झडती सुरु होती पहाटेपर्यंत

by nagesh
Anti Corruption Bureau Pune | Two clerks of Pimpri Chinchwad Municipal Corporation caught by anti-corruption pune while takeing bribe

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन -Anti Corruption Pune-Pimpri | पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांसह पाच जणांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Pune-Pimpri) बुधवारी सापळा रचून लाच घेताना पकडले. त्यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे यांच्या केबीनची झडती घेतली. तेव्हा तेथे तब्बल साडेआठ लाखांहून अधिक ‘बेहिशोबी’ रक्कम आढळून आली. हे पाहता या 1 लाख 18 हजार रुपयांच्या लाचेच्या अगोदरही अशा प्रकारे काही जणांकडून बुधवारी मोठ्या प्रमाणावर पैसे स्वीकारल्याचे आढळून आले आहे.  राजकीय क्षेत्रावर गेल्या काही वर्षात केलेली सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाई केल्यानंतर स्थायीचे अध्यक्ष अ‍ॅड. लांडगे आणि स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे यांच्या घराची झडती घेतली आहे. ही कारवाई पहाटेपर्यंत सुरु होती.
स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, मुख्य लिपिक व स्थायी समितीचे अध्यक्षांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे, लिपिक विजय शंभुलाल चावरिया, संगणक चालक राजेंद्र जयवंतराव शिंदे, शिपाई अरविंद भिमराव कांबळे अशा पाच जणांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची तक्रार आल्यानंतर अतिशय गुप्तता पाळण्यात आली. थोडी जरी शंका आली असती तर सापळा कारवाई अयशस्वी होण्याचा धोका होता. त्यामुळे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (ACB SP Rajesh Bansode), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा कारवाई कशी करायची याचे नियोजन करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक सीमा मेहेंदळे, श्रीहरी पाटील, पोलीस निरीक्षक गिरीश सोनवणे, हवालदार सरिता वेताळ, अश्यापक इनामदार, अंकुश माने, पोलीस अंमलदार अविनाश इंगुळकर, चंद्रकांत कदम यांनी प्रत्यक्ष सापळा कारवाई यशस्वी केली.

महापालिकेच्या जागेमध्ये होडिंग उभारण्यासाठी भरलेल्या 28 निविदा मंजूर झाल्या आहेत. पंरतु
त्यांची वर्क ऑर्डर न निघाल्याने तक्रारदार स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे व त्यांचे स्वीय
सहायक ज्ञानेश्वर पिंगळे यांना भेटले असता वर्क ऑर्डर मिळविण्यासाठीच्या करारनाम्यावर सही
करण्यासाठी त्या 28 निविदांच्या बोली रक्कमेच्या 3 टक्के रक्कम 10 लाख रुपये लाचेची मागणी
केली. तडजोडीअंती 2 टक्के प्रमाणे 6 लाख रुपये घेण्याचे मान्य केले व 6 लाख रुपयांची मागणी
करुन त्यापैकी तयार असलेल्या 6 करारनाम्यांच्या फाईल्सवर सही शिक्का देण्याकरीता लिपिक विजय चावरिया, संगणक चालक राजेंद्र शिंदे व शिपाई अरविंद कांबळे यांच्यामार्फत 1 लाख 18 हजार रुपये स्वीकारल्यानंतर सर्वांना ताब्यात घेण्यात आले होते. उपअधीक्षक सीमा मेहेंदळे अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Anti Corruption Pune-Pimpri | Pimpri-Chinchwad Corporation Standing Committee Chairman Adv. Nitin Landage House search by ACB

हे देखील वाचा :

PM Modi | PMO च्या ‘कानपिचक्या’ आणि पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर झाले ‘बंद’ !

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 172 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | मोक्कामध्ये फरार असलेल्या गायकवाड बाप-लेकावर पुणे पोलिसांची मोठी कारवाई, आवळल्या मुसक्या

NDA Exam for Women | आता महिला सुद्धा देऊ शकतात एनडीएची परीक्षा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Anti Corruption Pimpri Chinchwad | 9 लाखाचे लाचेचे प्रकरण ! पिंपरी-चिंचवड मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Gold Rate Today | विक्रमी स्तरापासून 8,700 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, खरेदीची हीच संधी! जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | पुण्यात वाईल्ड लाईफ फोटोग्राफरला बाणेर टेकडीवर लुबाडले, 2 जणांवर FIR

Related Posts