IMPIMP

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

by pranjalishirish
Army paper leak case: Army paper sent to Major Thiru Thangvel in exchange of Rs 25 lakh

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – लष्कर पेपर Army paper  फुटीप्रकरणात पुणे पोलिसांनी तिघांना जणांना येरवडा कारागृहातून ताब्यात घेत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक केली. दरम्यान दिल्ली येथील मेजर वसंत किलारी याने तामिळनाडुतील मेजर थिरु थंगवेल याला २५ लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर  Army paper  पाठविला असल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने तिघांना ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

मेजर वसंत विजय किलारी (वय ४५, रा. दिल्ली, मुळ गाव आंध्र प्रदेश), मेजर थिरु मुरुगन थंगवेलु (वय ४७, रा. वेलिंग्टन, तामिळनाडु) आणि भारत लक्ष्मण अडकमोळ (वय ३७, रा. पाचोरा, जि. जळगाव) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. भारत अडकमोळ याला मेजर थिरु थंगवेल याच्याकडून रिलेशन भरती प्रश्नपत्रिका व्हॉटसअ‍ॅपवर पाठविली होती. थिरु थंगवेल याला दिल्लीतील मेजर वसंत किलारी याने ती प्रश्नप्रत्रिका पाठविली होती. तर किलारी याला पवन नायडु याने ती पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

पवन नायडु हा व्यावसायिक आहे तो गुन्हा घडल्यापासून फरार आहे. त्याला लष्करातून ही प्रश्नपत्रिका कोणी पाठविली, त्याचा तपास सुरु आहे. परीक्षेला बसणार्‍या परिक्षार्थींकडून त्यांनी प्रत्येकी १ लाख रुपये घेतले आहे.

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

थिरु थंगवेलु याने आर्मी रिलेशन भरती प्रक्रिेयेच्या लेखी परिक्षेची प्रश्नपत्रिका देण्याच्या बदल्यात वसंत किलारी याला रोख २५ लाख रुपये देण्याच ठरले होते. त्यानुसार वसंत किलारी याने थिरु थंगवेल याला प्रश्नप्रत्रिका पाठविली. थिरु याने ती अडकमोळ याला पाठविली. अडकमोळ याने ती इतरांना पाठविल्याचे तपासात समोर आले आहे. वसंत किलारी याला पवन नायडु याने ही प्रश्नप्रत्रिका पाठविली होती. नायडु हा फरार असल्याने त्याला ही प्रश्नप्रत्रिका कोणी पाठविली होती, याचा शोध सुरु आहे. पोलिसांकडून आता आर्मी रिलेशन परीक्षेतील पेपरफुटीच्या  Army paper  तपासात गुंता सोडवित प्रश्नपत्रिका प्रथम कोणी फोडली, या दिशेने जात असून, व्यावसायिक पवन नायडुपर्यंत याचे धागेदोगे पोहचले आहेत.

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

या प्रशिणार्थीने दिलेल्या १ लाख रुपयांपैकी १० हजार रुपये महेंद्र सोनवणे याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित ९० हजार रुपये हस्तगत करायचे आहेत, असे पोलिसांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. तर आरोपींची पोलीस कोठडी मिळावी अशी विनंती केली. न्यायालयाने तीनही आरोपींना ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे अधिक तपास करत आहेत.

Also Read:

Kerala election : भाजपने 5 वर्षांपूर्वी उघडलेले खाते ‘या’ वर्षी आम्ही बंद करणार; ‘या’ नेत्याची जोरदार टीका

MPSC परीक्षेतून होणारा भाजपचा प्रचार थांबवा : यशोमती ठाकूर

पवार-शहा भेटीबद्दल प्रफुल्ल पटेल यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, राज्य सरकार स्थिर’

इंदुरीकर महाराजांना मोठा दिलासा ! न्यायालयानं रद्द केला ‘तो’ खटला

1 एप्रिलपासून कामाचे तास, वेतन बदलणार; जाणून घ्या सरकारचा प्लॅन

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

Related Posts

Leave a Comment