IMPIMP

CBI ACB Trap | एनटीपीसीच्या मजूर पुरवठादार ठेकेदाराकडून १ लाखांची लाच घेताना युपीएलचा इंजिनिअर जाळ्यात; सीबीआयने केली कारवाई

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption bureau : Sarpanch, deputy sarpanch in anti-corruption net in bribery case of 30,000

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – CBI ACB Trap | मजूर पुरवठा करणार्‍या ठेकेदाराकडून एक लाख रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताना एनटीपीसी (NTPC) अंतर्गत मुख्य मजूर ठेकेदार कंपनीच्या इंजिनिअरला केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) ने सापळा (CBI ACB Trap) रचून सोलापूरात (Solapur) पकडले. गोविंदकुमार (Govindkumar) असे या इंजिनिअर अधिकार्‍यांचे नाव आहे. त्याचा सहकारी अभिषेक कुमार सिंग (Abhishek Kumar Singh) पळून गेला आहे.

फताटेवाडी येथील एनटीपीसी कंपनीने युपीएल (युटीलिटी पॉवरटेक लिमिटेड (UTILITY POWERTECH LIMITED) या कंपनीला मनुष्यबळ पुरविण्याचे मुख्य कंत्राट दिले आहे. ही कंपनी स्थानिक ठेकेदारांना लिलाव पद्धतीने मजुर पुरवठ्याचे कंत्राट देते, एनटीपीसी मध्ये २० मजूर पुरवठ्याचे काम करतात. सुमारे ३ हजार मजुरांना ठेकेदारामार्फत काम दिले जाते. दरवर्षी अशा पद्धतीने ५० कोटींचे कंत्राट या कंपन्यांना दिले जाते. सध्या मजुर पुरवठा करणार्‍या ठेकेदारांची संख्या वाढल्याने त्यांच्यात स्पर्धा सुरु झाली. त्यातून जास्तीत जास्त लाच देणार्‍या ठेकेदाराला ठेका दिला जात होता. (CBI ACB Trap)

होटगी स्टेशन येथील उपठेकेदाराची कंपनीकडे ५ लाख रुपये सुरक्षा ठेव होती.
ती परत मागताना गोविंदकुमार याने अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती.
या उपठेकेदाराने पुण्यातील सीबीआयच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (CBI ACB Trap) तक्रार केली.
त्याची पडताळणी केली असताना गोविंदकुमार याने २ लाख रुपयांवर तडजोड केली.
त्यानंतर त्यातील पहिला हप्ता १ लाख रुपये स्वीकारण्याचे त्याने कबुल केले.
त्यानुसार सीबीआयने शनिवारी दुपारी एक वाजता सापळा रचला. उपठेकेदाराकडून १ लाख रुपये घेताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.

Web Title : – CBI ACB Trap | UPL engineer caught in the net while accepting a bribe of 1 lakh from NTPCs labor supply contractor Action taken by CBI

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

How to Make Protein Powder | प्रोटीन पावडर बनवण्यासाठी कोणत्या वस्तूंची गरज भासते, येथे जाणून घ्या घटक आणि कृती

Flaxseed Benefits | या बिया खाल्ल्याने होतील 10 जबरदस्त फायदे, डायबिटीज आणि हार्ट डिसिजवर करतात वार

Ration Cards | सरकारने रेशन कार्ड जारी करण्यासाठी नवीन रजिस्ट्रेशन सुविधा केली जारी, जाणून घ्या आता कसा करावा अर्ज ?

Related Posts