Chandan Nagar Pune Crime News | फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या तिघा सायबर चोरट्यांना भुजमधून अटक
पुणे : Chandan Nagar Pune Crime News | फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक (Forex Trading Investment) केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, असे सांगून २० लाख रुपयांची फसवणूक (Online Cheating Fraud Case) करणार्या तिघा सायबर चोरट्यांना (Cyber Thieves Arrested) चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police Station) गुजरातमधील भूज येथून जेरबंद केले.
नाकर रोनक आश्विनभाई (वय २८, रा. कैलासनगर, भूज), शहा मोहितकुमार दिनेशशाई (वय २७, रा. नखतराणा जि. कच्छ), सोधा दिव्यराजसिंग अमरसंग (वय २४, रा. कोठारा, ता. हावडासा, जि. कच्छ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
फिर्यादी यांना टेलिग्रामद्वारे संपर्क साधून फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळवुन देतो, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून २८ लाख रुपये १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२४ दरम्यान घेतले. त्यानंतर त्यांना कोणताही परतावा न देता त्यांची फसवणूक केली होती.
या गुन्ह्याचे अनुषंगाने फसवणुक झालेल्या पैशांबाबत तसेच बँक खाते धारकाबाबत माहिती घेतल्यावर बँक खातेधारक भूज येथील असल्याचे दिसून आले. त्यांचे जी मेलच्या आयपी अॅड्रेसवरुन प्राप्त झालेल्या मोबाईचे लोकेशन ही भूज येथील असल्याचे समजले. त्यानंतर चंदननगर पोलीस ठाण्याचे सायबर पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर रेवले, पोलीस अंमलदार उकिर्डे, पानपाटील हे भूजला गेले. त्यांनी नाकर आश्विनभाई याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात इतर दोघांचा सहभाग असल्याचे आढळून आल्यावर त्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar), सहायक आयुक्त विठ्ठल दबडे (ACP Vitthal Dabade), वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण (Sr PI Sanjay Chavan), पोलिस निरीक्षक अनिल माने (PI Anil Mane) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर रेवले, उकिर्डे, पानपाटील, वानखडे, डहाळे, थोरात यांनी ही कामगिरी केली.
Comments are closed.