IMPIMP

chargesheet against Hanuman Nazirkar | बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्याविरोधात 40 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

by bali123
chargesheet against Hanuman Nazirkar | Unaccounted assets: 40,000 page chargesheet filed against suspended Suspended Town Planning joint director Hanuman Jagannath Nazirkar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनchargesheet against Hanuman Nazirkar | नगररचना विभागातील निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर (joint director Hanuman Nazirkar) यांच्यावर दाखल असलेल्या बेहिशोबी मालमत्ता (Anonymous assets) बाळगल्याप्रकरणात पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune Bribery Prevention Department) आज न्यायालयात तबल 40 हजार पानांचे दोषारोपपत्र (40 Thousand Page Indictment) दाखल केले आहे. आतापर्यंत 82 कोटींची मालमत्ता उघड झाली आहे. एसीबी (ACB) कडील हा सर्वात मोठा बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा आहे. दरम्यान सध्या हनुमंत नाझीरकर  (Hanuman Nazirkar) हे कारागृहात आहेत. chargesheet against Hanuman Nazirkar | Unaccounted assets: 40,000 page chargesheet filed against suspended Suspended Town Planning joint director Hanuman Jagannath Nazirkar

बेहिशोबी मालमत्ता बाळगल्या प्रकरणी जून 2020 मध्ये एसीबीने नगररचना विभागातून निलंबित केलेले सह संचालकास हनुमंत जगन्नाथ नाझीरकर (Joint Director Hanumant Jagannath Nazirkar) (वय 55, रा. स्वप्नशिल्प सोसायटी कोथरूड) यांच्यावर पुण्यातील आलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) गुन्हा दाखल केला. त्यानंतर या गुन्ह्यात एकूण 8 आरोपींचा सहभाग आढळला आहे. त्यात पत्नी, मुलगी, मुलगा तसेच इतरांचा समावेश आहे. त्यात संगीता नाझीरकर, गीतांजली नाझीरकर, भास्कर नाझीरकर, राहुल खोमणे, अनिल शीपकुळे, बाळासाहेब घनवट, विजयसिंह धुमाळ (Sangeeta Nazirkar, Gitanjali Nazirkar, Bhaskar Nazirkar, Rahul Khomane, Anil Shipkule, Balasaheb Ghanwat, Vijay Singh Dhumal) अशी त्यांची नावे आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या गुन्ह्याचा तपास पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेंद्र बनसोडे (Superintendent of Police Rajendra Bansode) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गिरीश सोनवणे (Police Inspector Girish Sonawane) व पथकातील उदय ढवणे, अष्पाक इनामदार, अंकुश माने (Uday Dhawane, Ashpak Inamdar, Ankush Mane) यांच्याकडून सुरू होता.

एका वर्षात नाझीरकर यांच्याकडे 82 कोटींची मालमत्ता आढळून आली आहे. तर इतर 40 कंपन्यांचा तपास सुरू आहे. त्याचे अद्याप तपास करण्यात येत असून, त्यामुळे हा आकडा यात समाविष्ट नाही. तो आल्यानंतर बेहिशोबी मालमत्ता आकडा आणखी वाढणार आहे. दरम्यान 82 कोटींचा आकडा हा त्यावेळच्या व्हॅल्यूवेशननुसार आहे. आजच्या बाजार भावानुसार तो दीडशे कोटींच्या पुढे जाऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे एसीबीकडे दाखल असलेल्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात हा सर्वाधिक मोठा गुन्हा असल्याचे एसीबीने सांगितले आहे.

प्रथम अडीच कोटींचीच आढळली होती संपत्ती…

नाझरीकर यांच्या 23 जानेवारी 1986 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीतील उत्पन्नाचे परिक्षण करण्यात आले होते.
त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी त्यांच्याकडे 2 कोटी 85 लाख 34 हजार 223 रुपये इतकी बेहिशोबी मालमत्ता आढळून आली होती.
मात्र आता एका वर्षाच्या तपासात ती 82 कोटींची झाली असून,
आणखी 40 कंपन्याबाबत तपास सुरू असून, त्याचा आकडा देखील कोटींमध्ये आहे.

नगररचना विभागात सह संचालक म्हणून कार्यरत असताना त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान त्यांच्यावर बारामती, पुणे, नवी मुंबई या शहरात गुन्हे दाखल आहेत.

Web Title :- chargesheet against Hanuman Nazirkar | Unaccounted assets: 40,000 page chargesheet filed against suspended Suspended Town Planning joint director Hanuman Jagannath Nazirkar

Related Posts