IMPIMP

Dapoli Crime News | दापोली तालुक्यात तीन वृद्ध महिलांचा जळून मृत्यू, घातपाताचा संशय; गावात उडाली खळबळ

by nagesh
Pune Crime News | Exciting! 2 children including a woman were killed and the bodies were burnt; Incident in Kondhwa

सरकारसत्ता ऑनलाइन -Dapoli Crime News | वणोशी (ता. दापोली) गावातील खोतवाडी येथे एकाच घरात तीन वृद्ध महिलांचा (Old Woman) जळून मृत्यू झाल्याची घटना उघकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. सत्यवती पाटणे (वय ७५), पार्वती पाटणे (वय ९०), इंदुबाई पाटणे (वय ८५) अशी मृत वृद्ध महिलांची नावे आहेत. (Dapoli Crime News)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पालगड रोडवरील वणोशी गावात असलेल्या खोतवाडीत सुमारे २५ घरे आहेत. येथील लोक काम धंद्यानिमित्त मुंबईला असल्याने बहुतांश घरे बंद आहेत. गावात केवळ चार-पाच कुटुंबेच वास्तव्य करत आहेत.
त्याती एका घरात सत्यवती पाटणे, पार्वती पाटणे राहत होत्या तर त्यांच्या घरासमोर नातेवाईक असलेल्या इंदुबाई पाटणे राहत होत्या.
थंडीच्या दिवसांमुळे या दोन्ही घराचे दरवाजे आणि खिडक्या लवकर बंद होत होत्या. मात्र, रोज सकाळी या तीन ही महिला उन्हात बसत असत. शिवाय घरासमोरील मंदिरात नित्यनियमाने पूजाअर्चा करत होत्या. त्यामुळे विनायक पाटणे यांनी ही मंदिराच्या दरवाजाची चावी त्यांच्याकडे च दिली होती.

 

 

शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे पाटणे मंदिरात पुजासाठी आले असता त्यांना या महिला उन्हाळ बसलेल्या दिसल्या नाहीत.
शिवाय मंदिराच्या कुलूपाची चावी हवी असल्याने ते या महिलांच्या घरामध्ये गेले. मात्र, आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
त्यानंतर त्यांनी घराच्या मागील बाजूचा दरवाजा ढकलून पाहिला असता तो त्यांना उघडा दिसला.
आतमध्ये त्यांनी पाहिले असता त्यांना या वृद्ध महिला मृतावस्थेत आढळून आल्या. (Dapoli Crime News)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

विनायक पाटणे यांनी ही घटना ग्रामस्थांना सांगितले. ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांना ही खबर दिली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी घरामध्ये तीन खोल्यांमध्ये तीन महिला मृतावस्थेत आढळून आल्या. संबंधितांच्या नातेवाईकांनाही माहिती देण्यात आली. तेही शुक्रवारी सायंकाळपर्यंत दाखल झाले. पार्वती पाटणे या अनेक वर्ष एकाच जागेवर असल्याने त्या दुसऱ्या खोलीमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळल्या. तर समोरच्या घरात राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईक इंदुबाई पाटणे व सत्यवती पाटणे घरातील हॉलमध्ये मृताव्यवस्थेत आढळल्या. खोलीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा सडा पडला होता. घटनास्थळी अनेक संशयास्पद गोष्टी मिळून आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी घातपाताचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

Web Title : Dapoli Crime News | three old women burnt to death in dapoli

 

हे देखील वाचा :

Multibagger Super Stocks | ‘या’ आठवड्यातील स्टॉक – एकाने 90% रिटर्न्स दिला तर बाकीचे 50% पेक्षा जास्त पुढे

UP Assembly Election 2022 | निवडणूक आयोगाचा ‘सपा’ला झटका; कोरोना नियम उल्लंघनप्रकरणी अडीच हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा

Sara Sachin Tendulkar | सारा तेंडुलकरने व्यक्त केल्या तिच्या वेदना, म्हणाली – ‘आजकाल ‘या’ गोष्टीला मिस करतेय’

 

Related Posts