Gold-Silver Price Today | वटपौर्णिमेच्या दिवशी सोन्या-चांदीच्या किमतीत बदल; तुमच्या शहरातील भाव काय? जाणून घ्या

पुणे : Gold-Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. त्याचप्रमाणे मंगळवारी (१० जून) भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामुळे खरेदीदारांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, मंगळवारी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ९६,५०० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा भाव ८८,४५८ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा भाव १,०६,९१० रुपये आहे. तसेच, १० ग्रॅम चांदीचा भाव १,०६९ रुपये आहे.
आजचा सोन्याचा भाव –
मुंबई :
२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८८,३०३
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९६,३३०
पुणे :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८८,३०३
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९६,३३०
नागपूर :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८८,३०३
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९६,३३०
नाशिक :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८८,३०३
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९६,३३०