Grain Rice And Oil Seeds Merchants Association (GROMA) | दि. 27 ऑगस्ट रोजीच्या बंदनंतर आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय तसेच विधानसभा निवडणूकीमध्ये राजकीय भूमिका घेण्याचा व्यापाऱ्यांचा कृती समितीवर दबाव

पुणे: Grain Rice And Oil Seeds Merchants Association (GROMA) | महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती यांच्या तर्फे दि ग्रेन, राईस अॅन्ड ऑईल सीडस् मर्चेंटस् असोसिएशन (ग्रोमा) च्या माध्यमातून आज मुंबई येथे मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी व अजूबाजूच्या सर्व जिल्ह्यांच्या व्यापारी संघटनांची परिषद झाली. सदर परिषदेस महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचे सदस्य ललीत गांधी, जितेंद्र शहा, दिपेन अगरवाल, भिमजीभाई भानुशाली, राजेंद्र बाठिया, रायकुमार नहार व किर्ती राणा उपस्थित होते. तसेच मुंबई येथील विविध संघटनेचे पदाधिकारी व व्यापारी वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सदर सभेमध्ये दि. २७ ऑगस्ट रोजीचा बंद यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व व्यापाऱ्यांनी त्यामध्ये सहभागी व्हावे. सर्व प्रकारचे व्यावसायीक, रिटेल व्यापारी सदरच्या बंदमध्ये सामिल होणार असून सदरच्या बंदमध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. सामान्य जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन स्वइच्छेने बंद पाळण्यात येणार आहे. तसेच व्यापाऱ्यांच्या समस्यांवर शासनाकडून दि. ५ सप्टेंबर पर्यंत समाधानकार उत्तर न मिळाल्यास दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजी राज्यव्यापी परिषद घेण्यात येईल व त्यामध्ये अंदोलनाची पुढील दिशा अधिक तीव्र करण्यात यावी, असे एकमताने ठरले. तसेच आजच्या सभेमध्ये उपस्थित असलेल्या व्यापाऱ्यांतर्फे कृती समितीच्या सर्व सदस्यांवर आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन राजकीय निर्णय घेण्याबाबत दबाव टाकण्यात आला, अशी माहिती महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचे समन्वयक राजेंद्र बाठिया यांनी दिली.
Comments are closed.