IMPIMP

Hinjewadi Pune Accident News | पिंपरी : अखेर 20 दिवसांनी ‘त्या’ कार चालकावर गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घेतली दखल

by sachinsitapure

पुणे : – Hinjewadi Pune Accident News | पुण्यातील पोर्शे कार अपघाताचे (Porsche Car Accident Pune) प्रकरण ताजे असतानाच हिंजवडी पोलीस ठाण्याच्या (Hinjewadi Police Station) हद्दीत वाकड (Wakad) येथे एका भरधाव कारने रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणीला उडवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) सोशल मीडियावर व्हायरल (Viral On Social Media) झाल्यानंतर पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 23 मे 2024 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला आहे. हिंजवडीकडून वाकडकडे जाण्याऱ्या रस्त्यावर वाकड पुलालगत बस थांब्याजवळ माऊली स्नॅक्स दुकानासमोर हा अपघात झाला आहे. याप्रकरणी 20 दिवसांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

तुषार नेमाडे असे गुन्हा दाखल झालेल्या कारचालकाचे नाव आहे. उत्कर्ष संजयसिंह परदेशी (वय-23, रा. कॅम्प, पुणे मूळगाव काद्राबाद, जालना) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आकांक्षा संजयसिंह परदेशी (वय-23, रा. कॅम्प, पुणे मूळगाव काद्राबाद, जालना), असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. आरोपीवर आयपीसी 279, 337 सह मोटार वाहन कायदा कलम 184, 119/177 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अपघातग्रस्त तरुणी आकांक्षाचा भाऊ उत्कर्षला बोलवून गुन्हा दाखल केला आहे. अद्याप याप्रकरणी वाहनचालक तुषारला अटक करण्यात आली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण आकांक्षा ही 23 मे रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हिंजवडीकडून वाकडकडे जाणाऱ्या मार्गावर पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेने चालत जात होती. बस थांब्याजवळ माऊली स्नॅक्स दुकानासमोर आकांक्षा चालत जात असताना तुषार नेमाडे याने त्याच्या ताब्यातील कार भरधाव आणि बेदरकारपणे चालून आकांक्षाला पाठीमागून धडक दिली. यामध्ये ती जखमी झाली आहे.

फिर्यादी उत्कर्ष यांनी सांगितले की, अपघातामध्ये माझी बहिण आकांक्षा हिला मुका मार लागला. त्यानंतर आम्ही मुंबईला आलो. ती सध्या नॉर्मल असून डॉक्टरांनी तिला काही दिवस आराम करण्यास सांगितले आहे.

Related Posts