IMPIMP

Pune Crime | कोयते, चॉपर, चाकू विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक

by nagesh
pune-crime-pune-police-crime-branch-anti-extortion-cell-arrest-criminal-and-recover-weapons

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुण्यात घातक शस्त्र विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला (criminal) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक दोनच्या (Anti extortion Cell) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून कोयते, चॉपर आणि चाकू असा एकूण सहा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई पुण्यातील ताडीवाला रोडवर केली. (Pune Crime)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

अवतारसिंग कांचनसिंग जुनी (वय-42 रा. राजनगर, ओटा स्किम, सेक्टर नं. 22, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपीवर निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi police station) गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस अंमलदार शैलेश सुर्वे (Shailesh Surve) यांना सराईत गुन्हेगार ताडीवाला रोडवरील (Tadiwala Road) हॉटेल नुर मंजील जवळ घातक शस्त्रांची विक्री करण्यासाठी आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या मोपेड (एमएच 14 एचएफ 9828) च्या डिकीची तपासणी केली. त्यावेळी कापडी पिशीवत ठवलेले 2 कोयते, 4 चॉपर, 4 चाकू असे 10 धारदार शस्त्रे आढळून आली. त्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Shrinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक- 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare), पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), पोलीस अंमलदार शैलेश सुर्वे, प्रदिप शितोळे, विनोद साळूंके, विजय गुरव, राहुल उत्तरकर, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, सौदोबा भोजराव, प्रदिप गाडे, अमोल पिलाने, चेतन शिरोळकर, मोहन येलपल्ले, महिला पोलीस अंमलदार रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

हे देखील वाचा :

Jersey | शाहीद कपूरने शेअर केला जर्सी चित्रपटाचा नवीन पोस्टर, लिहिलं असं काही की…

Pune News | सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सतराव्या सेवा-त्याग-कर्तव्य सप्ताहाचे गुरुवारी उद्घाटन

Maharashtra Election Commission | ‘मतदार नाव नोंदणीसाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ’

Related Posts