Kasba Peth Assembly Voter Boycott | पुण्यात कसबा विधानसभा मतदारसंघातील 1 लाख नागरिक निवडणुकीवर बहिष्कार टाकणार; ‘हे’ कारण आले समोर
पुणे: Kasba Peth Assembly Voter Boycott | कसबा विधानसभा मतदारसंघातील सुमारे १ लाख नागरिक निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंच्या १०० मीटर परिसरातील बांधकामांना आणि दुरुस्तीला पुरातत्व विभागाकडून बंदी घालण्यात आली आहे. परिणामी शनिवारवाडा (Shaniwar Wada) आणि पाताळेश्वर (Pataleshwar) परिसरातील जुन्या वाड्यांची आणि काही इमारतींची पुनर्निर्मिती थांबली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
केंद्र सरकारच्या जाचक नियमामुळे नागरिक अत्यंत अडचणीत आहेत. खासदार, आमदार आणि नगरसेवकांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे कसब्यातील १ लाख नागरिक आगामी विधानसभा निवडणुकीत बहिष्कार टाकणार आहेत, असा इशारा शनिवारवाडा कृती समितीने (Shaniwar Wada kruti Commitee) दिला आहे.
शनिवार वाड्याच्या भिंतींना नवीन बांधकामामुळे काही तोटा होणार नाही, हे सद्यस्थितीला दिसून येत आहे. तरीही येथे बांधकामाला परवानगी दिली जात नाही. येथील जुन्या वाड्यांचे पुनर्निर्माण करण्यास अनेक अडथळे आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक आगीचा बंब, रुग्णवाहिका या अगदी प्राथमिक सुविधांपासून देखील वंचित आहेत.
या प्रश्नासाठी उपोषण करण्यासही पोलिस परवानगी देत नाहीत. हतबल नागरिक, उद्दाम सरकार, पालिकेचा संतापजनक कारभार यामध्ये येथील नागरिकांची कोंडी होत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कसब्यातील १ लाख नागरिक या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे शनिवारवाडा कृती समितीच्या अनुपमा मुजुमदार (Anupam Mujumdar) यांनी सांगितले.
Comments are closed.