IMPIMP

Manohar Mama Bhosale | मनोहर मामा भोसलेचा पुढील 5 दिवस पोलिस करणार ‘पाहुणचार’, न्यायालयाने दिला ‘हा’ आदेश

by nagesh
Manohar Mama Bhosale | Manohar Mama Bhosale’s stay in the police cell was extended

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Manohar Mama Bhosale | आपल्याकडे काही दैवीशक्ती असून आपण कॅन्सर (Cancer) बरा करू शकतो असा दावा करणाऱ्या मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा (Manohar Mama) याच्या साताऱ्यातून मुसक्या आवळल्या. यानंतर मनोहर भोसले उर्फ मनोहर मामाला (Manohar Mama Bhosale) अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश डी.एन. गिऱ्हे (Judge D.N. Girhe) यांनी त्याला 16 सप्टेंबर पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी (police custody) सुनावली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मनोहर मामा भोसले याने बारामती शहरातील (Baramati City) शशीकांत खरात यांची 2 लाख 51 हजार 500 रुपयांची फसवणूक केली होती. खरात यांच्या वडीलांना कॅन्सर झाला होता. कोणतीही शस्त्रक्रिया न करता कॅन्सर (Cancer) बरा करण्याच्या नावाखाली मनोहर मामा भोसले याने पैसे उकळल्याचा आरोप खरात यांनी केला आहे. याप्रकरणी खरात यांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात (Baramati Rural Police Station) तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी मनोहर मामा विरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी मनोहर मामा फरार झाला होता. पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखा (Pune Rural Police LCB) व बारामती तालुका पोलिसांनी मनोहर मामाला शुक्रवारी (दि.9) सातारा जिल्ह्यातील सालपे येथी फार्महाऊसवर जाऊन अटक केली होती.

मनोहर मामाला शुक्रवारी अटक करुन बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
आरोपीच्यावतीने अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे (Adv. Vijay Singh Thombre) यांनी बाजु मांडली.
तर पोलीस प्रशासनाच्या वतीने सरकारी वकील किरण सोनवणे (Public Prosecutor Kiran Sonawane) यांनी बाजु मांडली.
दोन्ही बाजुचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश गिऱ्हे यांनी मनोहर मामा भोसले याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान, मनोहरमामा भोसले यांना केलेली अटक बेकायदा आहे.
बनावट तक्रारदार उभा करुन सदरच्या गुन्ह्याबाबत तीन वर्षानंतर गुन्हा दाखल केल्याचा दावा आरोपीचे वकील अ‍ॅड. ठोंबरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. न्यायालयाच्या आवारात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
मनोहर मामाच्या भक्तांसह समर्थकांनी न्यायालय परिसरात गर्दी केली होती.

Web Titel :- Manohar Mama Bhosale | manohar mama bhosle five days police custody court

हे देखील वाचा :

Rain in Maharashtra | मध्य महाराष्ट्रासह कोकण पट्ट्यात ‘कोसळधार’ पावसाचा इशारा

Pune Court | खून प्रकरणातील 3 सख्या भावांची निर्दोष मुक्तता, व्याजाच्या पैशातून झाला होता खून

Mumbai University Recruitment 2021 | मुंबई विद्यापीठात विविध पदांसाठी भरती, जाणुन घ्या

Related Posts