IMPIMP

MHADA Paper Leak Case | म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलिसांकडून आणखी एकाला अटक

by nagesh
MHADA Paper Leak Case | mhada paper leak case one arrested pune cyber police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – MHADA Paper Leak Case | म्हाडा भरती परीक्षा (MHADA Recruitment Exam) दरम्यान पेपरफुटी प्रकरणाचा पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) पर्दाफाश केला आहे. काही दिवसांपूर्वी जी.ए.सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा. लि. (GA Software Technology Pvt. Ltd.) कंपनीचा संचालक डॉ. प्रितिश देशमुख (Director Dr. Pritish Deshmukh) याच्यासह अंकुश हरकळ (Ankush Harkal), संतोष हरकळ (Santosh Harkal) या एजंट बंधूंना अटक (Arrest) केली होती. म्हाडा पेपर फुटीप्रकरणात (MHADA Paper Leak Case) पुणे सायबर पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 11 झाली आहे. (Pune Cyber Crime)

म्हाडा पेपरफुटी प्रकरणाचा (MHADA Paper Leak Case) पोलिसांनी सखोल तपास करत एजंट कांचन श्रीमंत साळवे Kanchan Shrimant Salve (वय-31 रा. नागसेन नगर, धानोरा रोड, बीड) याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात आतापर्य़ंत 11 आरोपींना अटक केली आहे. आरोपी साळवे याला न्यायालयात (Pune Shivaji Nagar Court) हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

जी.ए. सॉफ्टवेअरचा डॉ. प्रितिश देशमुख याने म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी जवळपास 10 एजंटांशी (Agent) संपर्क केला होता. त्यांच्यामार्फत पेपर फोडण्याचा कट असल्याचे तपासात समोर आले आहे. या एजंटांनी परीक्षार्थींशी संपर्क साधून त्यांना पेपर कोरा सोडण्यास सांगितले होते. त्यानंतर ओएमआर शीटमध्ये (OMR Sheet) देशमुख फेरफार करुन परीक्षार्थींना पास करणार होता. परंतु पोलिसांनी त्याचा कट हाणून पाडला. पोलिसानी त्यांचे 4 पेन ड्राईव्ह, टॅब, मोबाईल जप्त केले आहेत.

Web Title : MHADA Paper Leak Case | mhada paper leak case one arrested pune cyber police

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Sanjay Raut on Kirit Somaiya | ‘भाजपा खासदार बृजभूषण सिंह अन् CM योगींबरोबर आम्हीपण जेवायला बसतो’ – संजय राऊत

Weight Loss Tips | तुम्हालाही तुमचे वजन कमी करयाचे असेल, तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; जाणून घ्या

SBI Student Loan काय आहे ? हे कोण आणि कोण-कोणत्या शिक्षणासाठी घेता येते ? जाणून घ्या सविस्तर

Sanjay Raut On Kirit Somaiya | ‘किरीट सोमय्या भ्रष्ट माणूस, ज्यानं देशाची चोरी केली ते मानहानी काय करणार ?’ – संजय राऊत

Sambhajiraje Chhatrapati | शिवबंधन बांधणार की नाही ?; छत्रपती संभाजीराजे म्हणाले…

Related Posts