IMPIMP

MLA Ravindra Dhangekar On Kalyani Nagar Pune Accident | पुणे हिट अँड रन प्रकरण : ‘पैसेवाल्यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करा’ आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी (Video)

by sachinsitapure

पुणे : – MLA Ravindra Dhangekar On Kalyani Nagar Pune Accident | पुण्यातील कल्याणी नगर परिसरात भरधाव वेगातील आलिशान पोर्शे कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला (Porsche Car Accident Pune). अपघातानंतर पळून जाणाऱ्या वाहन चालकाला नागरिकांनी पकडून चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. अपघातातील आरोपी शहरातील बांधकाम व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा आहे. या घटनेनंतर काही तासात आरोपीला जामीन मंजूर झाल्यानंतर नागरिकांडून संताप व्यक्त केला जात आहे. तर आरोपींना पोलीस ठाण्यात नेण्यात आल्यानंतर त्यांना विशेष वागणूक देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरुन काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या एक्स वर एक पोस्ट लिहून केवळ पैश्यावाल्यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या या व्यवस्थेतील हे भ्रष्ट अधिकारी कायमस्वरूपी निलंबित केली पाहिजेत, अशी मागणी केली आहे.

काय म्हणाले रवींद्र धंगेकर?

कल्याणीनगर प्रकरणात आवाज उठवल्यानंतर पुणेकरांच्या दबावापुढे पोलीस प्रशासन नमले. आज तत्परता दाखवत आरोपी विशाल अग्रवाल याला अटक केली आहे. परंतु केवळ विशाल अग्रवाल याला अटक करून हे प्रकरण थांबणार नाही तर येरवडा पोलीस स्टेशनचे पी.आय व तपास अधिकारी यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे. मोठा आर्थिक व्यवहार झाल्यानंतर तपासात दिरंगाई करत सर्व आरोपीस मदत होईल असाच तपास पोलिसांनी केला आहे. अपघाताच्या रात्री काय झाले याबाबत येरवडा पोलीस स्टेशन व ससून मधील सी.सी.टी.व्ही फुटेज चेक करण्यात यावे. केवळ पैश्यावाल्यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या या व्यवस्थेतील हे भ्रष्ट अधिकारी कायमस्वरूपी निलंबित केली पाहिजे, असे रविंद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.

https://x.com/DhangekarINC/status/1792789761826119953

तर सीसीटीव्ही तपासा

पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्या मुलाला विशेष वागणूक देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणात आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली असल्यास, त्यावेळचे पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असेल तर तात्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

Related Posts