IMPIMP

Nawab Malik | मंत्री नवाब मलिकांच्या नव्या दाव्यामुळं प्रचंड खळबळ; क्रांती रेडकरच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्जची केस?

by nagesh
Nawab Malik | NCP minister nawab malik shared kranti redkar chats screenshot sameer wankhede case marathi news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Nawab Malik | मुंबई ड्रग्ज कारवाई प्रकरणावरुन (Mumbai Drugs Case) राज्यात मोठी घडामोड घडताना दिसत आहे. यामुळे राजकीय वातावरण देखील तापलेलं पाहायला मिळत आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. तर, मलिकांनी आता समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरवर (Kranti Redkar) निशाणा साधला आहे. यामुळे आता या प्रकरणामुळे आणखी खळबळ उडाली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

क्रांती रेडकरच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्जची केस नोंदवलेली आहे, पुण्यात ड्रग्जचं प्रकरण प्रलंबित असल्याचा दावा नवा मलिकांनी केला आहे. तसेच, समीर वानखेडे यांनी या प्रकरणात उत्तर द्यावं. असं देखील मलिक यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून माहिती दिली आहे. नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले की, समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दिनानाथ रेडकर (Harshda Dinanath Redkar) ही ड्रग्जच्या व्यवसायात सामील आहे की काय? तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल कारण तिच्याविरोधातली केस पुणे न्यायालयात (Pune Cart) प्रलंबित आहे. या ट्वीटसोबत त्यांनी या प्रकरणातले पुरावे देखील दिल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, मी माझं म्हणणं ट्वीटमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे. केस पुण्याच्या कोर्टामध्ये प्रलंबित आहे. हे खरं आहे का? आणि त्यांचा समीर वानखेडेंशी काय संबंध आहे? याचा खुलासा वानखेडेंनी केला पाहिजे. असं नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सांगितलं आहे.

Web Title: Nawab Malik | nawab malik new twitter post drugs case registered on kranti redkars sister Harshda Dinanath Redkar in pune ncb officer sameer wankhede

हे देखील वाचा :

Pune Blood Donation Camp | महापौरांचा वाढदिवस ठरणार ‘रक्तदान महासंकल्प दिवस’ ! 9 नोव्हेंबरला रक्तदान शिबीर, रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल

ST Workers Strike | पुण्यात ‘लाल परी’ला लागला ब्रेक ! विभागातील ST ची सर्व वाहतूक ठप्प; दिवाळीनंतर परत गावी जाणार्‍यांचे हाल सुरु

Pune News | कोथरुड येथील सक्सेस स्क्वेअर सोसायटीच्या दिवाळी फराळ स्पर्धेत पाचोरकर, नलावडे विजयी

Related Posts