IMPIMP

Nitin Landge Bribe Case | …म्हणून न्यायालयाने पिंपरी मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगेंचा जामीन फेटाळला, येरवडा कारागृहात रवानगी

by nagesh
Nitin Landge Bribe Case | ... Therefore the court rejected bail application of Adv. Nitin Landage chairman of the standing committee of Pimpri Municipal Corporation, sent to Yerawada Jail in anti corruption case of pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Nitin Landge Bribe Case | पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (Pimpri Chinchwad Corporation) होर्डिंगची वर्क ऑर्डर मिळण्यासाठी 10 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे (standing committee chairman adv nitin landge Bribe Case) यांनी न्यायालयास अंतरिम जामीन मिळण्यासाठी खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जामीन मिळण्यासाठी केलेले लांडगे यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. अंतरिम जामीन ना मंजूर झाल्याने लांडगे यांची न्यायालयाने येरवडा कारागृहात (Yerwada Jail) रवानगी केली आहे.

आज्जीचे (आईची आई) निधन झाल्याने तिच्या अंत्यविधीनंतरच्या कार्यक्रमास जायचे आहे, असे कारण सांगून लांडगे यांनी अंतरिम जामीनासाठी अर्ज केला होता.
तो अर्ज मंजूर करीत 26 आॅगस्टपर्यंत जामीन देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर होण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
मात्र प्रत्यक्षात लांडगे यांच्या आज्जी नाही तर वडिलांच्या मावशीचे निधन झाले आहे,
अशी माहिती पोलिसांनी (anti corruption bureau pune) न्यायायलात दिली.
त्यामुळे लांडगे यांचा जामीन फेटाळून लावण्यात यावा, असा युक्तिवाद सरकारी वकील रमेश घोरपडे (Argument Public Prosecutor Ramesh Ghorpade) यांनी केला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, त्यांचा पीए ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे Dnyaneshwar Kisanrao Pingale (वय 56, रा. भोसरी), शिपार्इ अरविंद भीमराव कांबळे Arvind Bhimrao Kamble (रा. भीमनगर पिंपरी), संगणक आॅपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे Rajendra Jaywant Shinde (रा. थेरगाव वाकड) आणि लिपिक विजय शंभुलाल चावरिया Vijay Shambhulal Chawria (रा. धर्मराजनगर) यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. लांडगे यांनी यापूर्वी नियमित जामीनासाठी अर्ज केला आहे. इतर आरोपींनी देखील मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जनांवर शुक्रवारी ( तारीख 27) सुनावणी होणार आहे.

तक्रारदार हे जाहिरात ठेकेदार आहे. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेडील 26 वेगवेगळ्या जागांमध्ये होर्डिंग उभारण्यासाठी निविदा भरल्या होत्या. 2019 व 2020 च्या निविदा मंजूरही झाल्या. मात्र वर्क आॅर्डर निघाली नसल्याने त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे याच्याशी संपर्क केला. त्याने बोली रकमेच्या तीन टक्के रक्कमेनुसार १० लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती सहा लाख रुपयांचे देण्याचे ठरले. त्यातील एक लाख 18 हजार रुपयांची रक्कम पहिल्या टप्प्यात देण्याचे ठरले आणि उर्वरित रक्कम वर्क आॅर्डर प्राप्त झाल्यानंतर देण्याचे ठरले. एक लाख 18 हजार रुपयांची रक्कम पिंगळे यांनी स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटककारवाई केली आणि पाच जणांना अटक केली.

अ‍ॅन्टी करप्शनचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (SP Rajesh Bansode, ACB Pune),
अप्पर अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा
(Addl SP suhas nadgouda) यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या
सहायक पोलीस आयुक्त सीमा मेहेंदळे (DySp Seema Mehendale) या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Web Title : Nitin Landge Bribe Case | … Therefore the court rejected bail application of Adv. Nitin Landage chairman of the standing committee of Pimpri Municipal Corporation, sent to Yerawada Jail in anti corruption case of pune

हे देखील वाचा :

Bank Rules | SBI, HDFC, ICICI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! 30 सप्टेंबरला बंद होणार आहे ही सुविधा; जाणून घ्या

Narayan Rane | नारायण राणे रुटीन चेकअपसाठी लिलावती रुग्णालयात दाखल

Pune Metro | लष्कराच्या प्रशिक्षणादरम्यान मेट्रो शेडवर झाला गोळीबार, मेट्रोचा कर्मचारी जखमी

Related Posts