IMPIMP

Pimpri Crime | वेडा म्हटल्याचा विचारला जाब, टोळक्याने बेदम मारहाण करत केला खून; पिंपरी-चिंचवड परिसरात खळबळ

by nagesh
Pune Crime News | Another wife who drank liquor without food was kicked to death by Lathabukkis; Rickshaw driver arrested

पिंपरी (Pimpri) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)–  पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad Crime) वेडा म्हणून चिडवल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून (Murder) झाल्याची घटना घडली आहे. टोळक्याने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी (Pimpri Crime) दोघांना अटक (Arrest) केली आहे. ही घटना पिंपरीतील मिलिंद नगर (Milind Nagar) येथील डिलक्स चौकात 5 ऑगस्ट रोजी तीनच्या सुमारास घडली. जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा रविवारी सव्वा पाचच्या सुमारास मृत्यू झाला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मनोज राजु कसबे (वय-25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. काळ्या उर्फ सचिन निकाळजे (वय-40 रा. क्यु बिल्डींग, मिलिंद नगर, पिंपरी), शौकत समीर शेख (वय-32 रा. बिल्डींग नं.4, मिलिंदनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर चिम्या उर्फ सुरेश निकाळजे, मनोज अर्जुन जगताप, आनंद कदम, संतोष कदम, भुषण डुलगल इतर साथिदारांवर खुनाचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयत मनोज याची आई पुष्पा राजु कसबे (वय-50 रा. डी. बिल्डींग, मिलिंद नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या मनोजला आरोपी हे दररोज ‘तू वेडा आहेस’ (You are crazy) असे चिडवत होते. मी वेडा नाही असं मनोज वारंवार त्यांना सांगत होता. तरी देखील आरोपी त्याला तू वेडा आहेस म्हणून चिडवत होते. त्यामुळे संतापलेल्या मनोजने आरोपींसोबत वाद घातला. यानंतर आरोपींनी मनोजला काठीने मारहाण (Beating) केली. तसेच लाथा बुक्क्यांबरोबरच खुर्ची, लाकडी दांडके आणि लाकडी स्टंपने बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मनोजला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तीन दिवसांनी मनोज याचा उपचारादरम्यान मृत्यू (Death during treatment) झाला. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Web Title : pimpri crime murder in pimpri chinchwad area

हे देखील वाचा :

Digital Transactions | प्रत्येक ठिकाणी कॅश करणार्‍यांनी व्हावे सावधान, अशाप्रकारचे 10 ट्रांजक्शन केल्यास येईल Income Tax ची नोटीस

Pune Corporation | पंचवटी ते कोथरूड बोगद्याच्या कामासाठी पुणे महापालिकेची चाचपणी सुरू

MP Sanjay Jadhav | शिवसेना खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले – ‘राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू’

Delta Plus Variant | राज्यात डेल्टा प्लसचा धोका वाढला; बीडमध्येही आढळला रुग्ण

Related Posts