IMPIMP

Pimpri : ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणाऱ्या आदित्य बिर्ला हॉस्पीटल, लोकमान्य हॉस्पीटल अन् डॉ. डी.वाय हॉस्पीटलला कारणे दाखवा नोटीस

by pranjalishirish
Pimpri : Remedesivir injection sold at exorbitant rates! PCMC give Show cause notice to Aditya Birla Hospital, Lokmanya Hospital and Dr. DY Hospital

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन-  कोरोना गंभीर रुग्णांसाठी ‘मॅजिक ड्रग’ म्हणून समजले जाणारे रेमडेसिविर इंजेक्शनला सध्या प्रचंड मागणी वाढली आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. याचा फयदा घेऊन पिंपरी चिंचवडमधील तीन हॉस्पिटलकडून रेमडेसिवीर Remedesivir  इंजेक्शनची चढ्या दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. या हॉस्पिटलच्या व्यवस्थापनांना पिंपरी चिंचवड महापालीका आयुक्त राजेश पाटील यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 48 तासांच्या आत या संदर्भात खुलासा करण्यास सांगितले आहे.

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

रेडमेसिवीर इंजेक्शन रुग्णालयाबाहेर अॅडमिट असलेल्या रुग्णांना अधिक किंमतीने विकत असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शहरातील आदित्य बिर्ला हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल यांचे संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे अधिष्ठाता तथा वैद्यकीय अधिकारी यांना कारणे देखवा नोटीस बजावली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले – ‘भिडेंचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी’

सध्याच्या परिस्थितीत रेमडेसिवीर Remedesivir इंजेक्शन विक्रीच्या अशा प्रकारामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याची सखोल चौकशी करुन पुढील 48 तासात झालेल्या घटनेचा अहवाल द्यावा असे नोटीसीत नमुद करण्यात आले आहे. तसेच साथरोग अधिनियम, 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 अंतर्गत आपणा विरुद्ध आवश्यक कारवाई का करु नये असे देखील नोटीसीत म्हटले आहे.

Read More : 

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’

Jayant Patil : भाजप बोलतेय तशीच चौकशी NIA कडून सुरु, सचिन वाझेचा म्होरक्या कोण?

सचिन वाझेंच्या पत्रावरून फडणवीस म्हणाले; ‘पत्र गंभीर…

Chandrakant patil : ‘केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी ठोक ठोक ठोकलंय’

संभाजी भिडे यांची जीभ घसरली, म्हणाले – ‘कोरोना अस्तित्वात नाही, जे जगायचे ते जगतील अन् मरायचे ते मरतील’

महाराष्ट्रापेक्षा गुजरातला लसीचा पुरवठा अधिक, राजेश टोपेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

‘महाराष्ट्राला सर्वात जास्त लसी मिळायला हव्यात, मात्र मुद्दाम दिल्या जात नाहीत’, जयंत पाटलांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

Related Posts