IMPIMP

PMC 7th pay Commission | 7 व्या वेतन आयोगावरून सर्वसाधारण सभेत ‘नरम नोकझोंक’

by nagesh
Pune PMC News | Pune Municipality will impose a fine of Rs 1,000 on illegal flex, banner and hoardings, if the fine is not paid, the revenue will be taxed.

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन PMC 7th pay Commission | राज्य शासनाने पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) अधिकारी व कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग (PMC 7th pay Commission) लागू करताना मुख्य अभियंता, उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांच्या वेतनासंदर्भात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने दिलेला प्रस्ताव फेटाळल्याने सत्ताधारी भाजप व महाविकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये आज सर्वसाधारण सभेत ‘नोकझोक’ झाली. मात्र, महापौरांनी समन्वयाची भुमिका घेतल्याने अल्पचर्चेनंतर यावर पडदा पडला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू होताच माजी सभागृहनेते व सातवा वेतन आयोग समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले (shrinath bhimale) यांनी राज्य
शासनाने महापालिकेने अधिकार्‍यांच्या वेतनश्रेणीबाबत (PMC 7th pay Commission) दिलेला प्रस्ताव फेटाळल्याने नाराजी व्यक्त केली. महापालिका वेतनावर खर्च करणार असताना राज्य शासनाने मान्यता न दिल्याने दुख झाल्याची भावना व्यक्त केली. भिमाले यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार आणि प्रशांत जगताप यांनी भिमाले हे दिशाभूल करत आहेत. उलट सत्ताधार्‍यांनीच सातवा वेतन आयोग लागू करण्याचा प्रस्ताव दीर्घकाळ प्रलंबित ठेवला. राज्य शासनाने (Maharashtra Government) त्यांच्याकडे प्रस्ताव पाठविल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत तो मंजूर केला. सर्वसाधारण सभेत आम्ही देखिल या प्रस्तावाला पाठींबा दिला आहे, हे भिमाले यांनी विसरू नये. काही त्रुटी असतील पुन्हा एकदिलाने शासनाकडे दाद मागू अशीही भुमिका त्यांनी मांडली.

वाद वाढत असल्याचे लक्षात आल्याने महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी शासनाने प्रस्ताव जशाच्या तसा मंजूर केला नाही. मात्र, शिपाई, बिगारी अशा कष्टकरी वर्ग चार, वर्ग तीनच्या बहुसंख्य कर्मचार्‍यांची वेतनवाढ झाली. परंतू वरिष्ठ स्तरावरील अधिकार्‍यांच्या वेतनाबाबत समकक्ष पदावरील राज्य शासनातील व अन्य स्थानीक स्वराज्य संस्थांतील अधिकार्‍यांच्या वेतनाचा तौलानिक विचार केल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळत आहे. अधिकार्‍यांना महापालिकेने प्रस्तावित केलेल्या वेतनश्रेणीनुसार वेतन मिळावे यासाठी सर्वजण पुन्हा एकदा एकत्रितपणे दाद मागू, असे म्हणत चर्चेवर पडदा टाकला.

Web Titel :- PMC 7th pay Commission | pune corporation general body meeting

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 171 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corporation | तळजाई हिल टॉप हिल स्लोपवरील ‘बहुचर्चित’ जैवविविधता उद्यानाचा मास्टरप्लॅन मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

Beed Crime | दुर्देवी ! मायलेकीचा विहीरीत बुडुून मृत्यु; मृत्युनंतरही चिमुकलीने आईला मिठ्ठी मारली होती

Related Posts