IMPIMP

PMC Gunthewari | पुणे महापालिकेने गुंठेवारीतील प्रस्ताव दाखल करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढविली

by nagesh
Pune PMC News | Strict enforcement of plastic bag ban! On the first day itself, PMC took action against 14 traders and seized 391 KG plastic bags Single Use Plastic Ban

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन PMC Gunthewari | पुणे महापालिका Pune Municipal Corporation (PMC) हद्दीतील गुंठेवारीतील घरे (Gunthewari Home In Pune) नियमीत करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्याची मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. १० जानेवारीला सुरू करण्यात आलेल्या या मोहीमेची (Gunthewari Regularisation Scheme) मुदत ३१ मार्चला संपली असून महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार (PMC Administrator and Commissioner Vikram Kumar) यांनी ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मोहीमेअंतर्गत आतापर्यंत फक्त ७७ प्रस्ताव दाखल झाले आहेत. (PMC Gunthewari)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

राज्य शासनाने गुंठेवारीतील घरे नियमीत करण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार पुणे महापालिकेने १० जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत हद्दीतील गुंठेवारीतील मिळकतधारकांकडून प्रस्ताव मागविले होते. या कालावधीत ७७ प्रस्ताव दाखल झाले आहेत. वास्तविकत: शहरातील विविध भागांमध्ये छोट्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत. बांधकाम नियमावलीतील अटींमुळे छोट्या भूखंडांवर महापालिकेची परवानगी घेउन घरे बांधण्यात अडचणी येत असल्याने सर्वसामान्य स्तरातील नागरिकांनी अनधिकृतपणे ही बांधकामे केली आहेत. (PMC Gunthewari)

यापैकी जी घरे नियमान्वीत होउ शकतात त्यांचे नियमितीकरण करण्यासाठी राज्य शासनाने गुंठेवारी कायद्यान्वये ती शुल्क आकारून अधिकृत करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, यासाठीच्या अटी व शर्तींमुळे तसेच किचकट प्रक्रियेमुळे अनेकांनी पाठ फिरविली आहे. तसेच हे प्रस्ताव आर्किटेक्ट अथवा इंजिनिअरच्या माध्यमातून सादर करावे लागणार असून त्यांची फी परवडत नसल्यानेही अनेकांनी या योजनेकडे पाठ फिरविली आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी आर्कीटेक्ट अथवा इंजिनिअरने ५ हजार रुपये फि आकारावी असे आवाहन केले आहे.

Web Title :- PMC Gunthewari | Pune Municipal Corporation has extended the deadline for filing proposals in Gunthewari till June 30

हे देखील वाचा :

Delhi Saket Court | ‘मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांच्या संपत्तीवर जावई, नातवांचा हक्क’ – कोर्टाचा महत्‍वपूर्ण निर्वाळा

Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण; जाणून घ्या लेटेस्ट भाव

Pune Crime | धक्कादायक ! विमाननगर परिसरातील बॅकस्टेज पबमध्ये नेऊन अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे, 19 वर्षाच्या मुलावर FIR

Related Posts